श्री यमाई देवीचे पुजारी प्रसाद गुरव यांनी पायी केलेली हिमालय परिक्रमा , त्यांनी कापलेले सुमारे सात हजार किमी अंतर व धर्मक्षेत्री भेटीचा उपक्रम आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे. हिमालय परिक्रमा करून श्री प्रसाद गुरव औंध मुक्कामी पोहचले आहेत. औंध येथे त्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाला संबोधित करताना श्री स्वामी शिवानंद भारती महाराज अंभेरी बोलत होते .
श्री प्रसाद गुरव यांनी हिमालय परिक्रमेत आलेले अनुभव, आलेल्या अडचणी, औंध ते हिमालय पायी मार्गाचे वर्णन, भेटी दिलेल्या वेगवेगळ्या धर्मक्षेत्रांचे महत्त्व, वाटेत भेटलेले नागा साधू, नागा साधूंनी कथन केलेले शिवपार्वती निर्मित धर्ममार्गाचे जागतिक महत्त्व, तेथील परंपरा त्यांची विस्तृत चर्चा केली.
श्री यमाई देवी पुजारी राजेंद्र गुरव यांनी प्रसाद यांचे स्वागत करताना परिक्रमेचे महत्व, जीवनाच्या सायंकाळी हिंदू धर्मातील परंपरेची काशी यात्रा, बदलती परिस्थितीतील विविध धार्मिक परिक्रमा आणि मंदिर शैव पुरोहित गुरव महंत यांचे कर्तव्य, भगवान महादेवाने दिलेली मोक्षकेंद्रीत व्यवस्था, परिक्रमेचे धर्मशास्तीय महत्व विशद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवशक्ती पूजा, शिव वंदना, शिवस्तुती इत्यादी धार्मिक कार्यक्रम झाले.
या कार्यक्रमास धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विविध मंदिरांचे शैव पुरोहित, मठाधिपती, गुरव पुजारी, महंत, गोसावी, शैवाचार्य यांनी प्रसाद गुरव यांना आशिष दिले. महावस्त्र व हिमालयामध्ये साधना केलेले शैवाचार्य कैवल्यमूर्ती कै कृष्णाजी गुरव, कोल्हापूर लिखित “ब्रम्हसाम्राज्य दीपिका” हे पुस्तक सन्मानपूर्वक भेट देण्यात आले.
(ब्रह्मसाम्राज्य दीपिका हे कैवल्य मूर्ती कृष्णाजी गुरव यांना हिमालयातील साधना काळात दिलेल्या अनुभवांचे अनुभूतींचे माहिती संकलन आहे.) कै.रामचंद्र गुरव पंढरपुरकर यांच्या भारत परिक्रमेचे स्मरण श्री शैलेंद्र गुरव यांनी केले. तर शिवप्रतापदिनाच्या अनुषंगाने श्री यमाई मूळपीठ भवानी औंध मंदिराचे तत्कालीन गुरव पुजारी यांनी केलेल्या रक्षणाचा रोमहर्षक इतिहास श्री अमोल गुरव यांनी सांगितला.
धर्मगुरु व ज्येष्ठांच्या हस्ते प्रसाद गुरव यांना धर्मध्वजा प्रदान करण्यात आली. महाआरती व कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री तेजस गुरव, सौ पुष्पा गुरव व सहकारी, दादा शिंदे, खटावकर सर, चव्हाण गुरुजी, सुरेश जाधव, सचिन सुकटे, श्री रमेश गुरव, सागर गुरव, अवधूत गुरव हणमंत गुरव, राजा, ऋषीकेश गुरव धनंजय गुरव, कल्पना गुरव, शोभा गुरव, सुरेखा गुरव, सौ मीरा, सौ सुनिता, सौ दया, सौ.स्वाती, सौ.तनुजा गुरव, कु.साक्षी वैष्णवी सार्थक गुरव व श्री. यमाई देवी गुरव पुजारी संघटना, प्रसाद मित्रमंडळ, भक्तजण यांनी सहकार्य केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800