काल जेवले त्यांना…
आज डच्चू दिला आहे..!
सगळ्या वाढेकऱ्यांना…
तसा इशारा दिला आहे..!
एवढे,तसे निश्चित नाही…
पंगती,अजून बाकी आहे..!
आमंत्रण मिळूनही…
वाढणे तसे, बाकी आहे…!
पाहुण्यांच्या गडबडीत…
कारभारी गुंतले आहेत…!
घरच्यांनी घ्यावे सावरत…
उरले ते, आपलेच आहे…!
एक जत्रा, हुकली म्हणून…
देव म्हातारा होत नाही…!
पुन्हा एका जोमानं…
पुजा-अर्चा, करावी काही..!
घडा भरेपर्यंत…
उलथा कोणी पाडू नाही..!
तेल गेले,
धुपाटणे कोणी…
सोडू नाही…!
आवरा-सावर झाल्यावर…
तुमचा नंबर येऊ शकतो..!
उगाच फुटक्या मटक्यावर…
दोष नशीबाचा फोडू नये..!
— रचना : बबनराव वि.आराख. बुलडाणा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800