किती किती वाढली बघा
ही गार गार भयंकर थंडी
सकाळी आधार शेकोटी
रात्री अंगावर गोधडी.
या थंडीने गारठून गेलाय
हा सगळा सारा परिसर
जिकडे तिकडे खरी शांतता
थंडीने केलाय कहर.
अंगात वारं शिरलं थंडीने
जणू अंग झालं कुडकडीत
थंडीच्या दिवसात गरमीचे
महत्व कळते घडीघडीत.
— रचना : भागवत शिंदे पाटील. उक्कडगांवकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800