एक -एक क्षण निसटून गेला
कॅलेंडरची पानं उलटवत गेला
दिवस-तारीख मोजत गेला
मनुष्य त्यातच गुरफटत गेला
नवीन वर्षाच्या स्वागताला
मात्र पुन्हा नव्याने हरखला
निसर्ग मात्र रोजच सज्ज असतो
रोजचा दिवस पाहण्यास उत्सुक असतो
नवा दिवस, नवीन आशा मध्ये रमतो
त्याच्यासाठी 2024-2025 सारखाच असतो
ऊन- सावलीच्या खेळात रंगूनी,
मावळत्या दिनकराला निरोप देऊनी
सोनेरी-नारिंगी रंगात न्हावूनी,
उगवते सूर्यबिंब देई
दररोज दाही दिशा उजळूनी
पानझडीत फ़ांद्या खिन्न वाकूनी
पालवी फुटता प्रफुल्लित होऊनी
अंधारात पाकळ्या मिटती
कळ्या उमलती सुगंध लेवूनी
फुलांवरी फुलपाखरे भिरभिरती
पक्षी बागडती, गाणी गाती
नद्या वाहती, पिके डोलती
हर्ष, स्वास्थ, सौंदर्य, प्रसन्नता
निसर्गाची खरी हिच तर महती
म्हणून वेळेचे महत्व जाणूनी
निसर्गास गुरु स्मरुनी
जुने सारे विसरूनी
दुःख मागे सारुनी
आपण सारे सज्ज होऊनी
करू स्वागत नववर्षाचे
चला करूया हर्षूनी
रचना : सुरेखा गावंडे. कल्याण (पूर्व )
संपादन : देवेंद्र भुजबळ.
निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेखा…खुपच छान….अगदी मस्त मनापासून कविता आवडली.
निसर्ग कसा फुलतो बहरतो रंगतो …अगदी मस्त शब्द रचना.
नववर्षाच्या तुम्हां सर्व कुटूबियांना खास हार्दिक शुभेच्छां.
सुंदर रचना… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा