१. नकळत
मी लिहीते काहीबाही
मनातले विचार,
माझ्या ही नकळत
उमटत जातात, शब्द कागदावर
जशी फुलं अलगदपणे उमलत जातात,
वेलींवर, झाडांवर
दाखवायचं नसतं मला
मनातलं साधर्म्य निसर्गाच्या बदलातलं
मी जगत असते या सर्वांच्या सोबतीने,
दिवसाच्या प्रत्येक प्रहरात.
२. नकळत
सूर्याची किरणे
घरात शिरली,
अलगदपणे दिसले,
डोळ्यांतील तेज
बोलताना हसायचीस तू
नकळतच, विलग झालेल्या ओठांतून
शुभ्रदन्तपंक्ती दर्शन देत,
सारंच कसं लोभसवाणं
काळाच्या उदरात गडप झालं
अगदी अचानकपणे !
— रचना : सुरेखा पाटील
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नेहमीसारखीच सुरेख कविता❤️