नमस्कार मंडळी.
आज आपल्या पोर्टल वर निखिल ढोले या नव्या कवीच्या कविता प्रसिद्ध करीत आहोत.
निखिल चे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील सायखेडा हे एक छोटेसे खेडे आहे. त्याचे शिक्षण बीएससी (एग्रीकल्चर) झाले असून तो सध्या पुण्यामध्ये कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथे (एमबीए एग्रीकल्चर) करीत आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्याचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
१
निद्रेस आज माझ्या का छळावे कोणी
संथ झालेल्या सागरात का मिळावे कोणी
डोळे मिटून माझी मी रचिन माझीच स्वप्ने
माझ्या ब्रम्हांडास समांतर का असावे कोणी
मी फेकले सारे प्रश्न इथे वाऱ्यावर
प्रश्नांचे मग उत्तर का शोधावे कोणी
प्रवासात माझ्या होतो मी एकटाच तेव्हा
सोबतीला आज मग का बसावे कोणी
हे एकलेपन मिळाले असावे नशिबाचे देणे
पुस्तकांची जहागीर माझी का लुटावी कोणी
मान्य माझे निर्णय असावे चुकीचे आजन्म
पावलांवर माझ्या का विचार करावा कोणी
स्वल्प विराम देणे असेना माझा छंद आता
स्वल्पाला त्या पूर्णविराम का समजावा कोणी
२
मी न येणार वेचाया प्रकाश त्या तुच्छ चांदण्याचा
विसरलो नाही पण माझा आकाश बांधण्याचा
मी नाशवंत आहे हा एवढाच सत्कार माझा
माझ्या न कामी शौक त्यांचा, अमृत सांडण्याचा
माझी ही नव्हती इच्छा ती पत्ते पिसण्याची
होता हट्ट तुझाच तो जुगार मांडण्याचा
शांत बसलो मी न तेव्हा, तयारी ची वेळ होती
विचार होता माझा तसाही दुनियेची भांडण्याचा
शेवटी मला कबूल विझने, माझ्याच फुंकरीने
डाव तसा त्यांचाही ही होता, मला कोंडण्याचा
३
मरणाचा मी अपमान केला नाही
विष संपले त्यांचे पण प्राण गेला नाही
त्यांची होती प्रतिष्ठा त्यांचे होते बहाणे
ते अन्याय थोपताणा आमचे मुके पाहणे
मुक्या मनाने आम्ही कितपत चालत गेलो
संपला रस्ता केव्हाच पण त्राण गेला नाही
आयुष्याची सारी पत्रावळी मी केली
जिंदगी च माझी सारी गुलाम झाली
त्या ढगांच्या आशेवर हा सगळा जुगार केला
रान करपले सारे तो मेघ बरसला नाही
— रचना : निखिल ढोले. सायगाव, ह.मु.पुणे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान गुढ कविता आहेत , अप्रतिम लिहिले आहेत 👌👌👌👌
Masterpiece 🔥🔥🔥
Khup Sundar kavita ahet nikhil
खूपच छान कविता लिहितोस तू….अप्रतिम.👌
वाह वाह… सुंदर कविता… खूपच आवडल्या.
खूप छान कविता लिहिली आहेस निखिल 👌🏻