Friday, March 14, 2025
Homeसाहित्यओली सांजवेळ

ओली सांजवेळ

ह्रदयाच्या कप्प्यात
जपून ठेवली
आठवण तुझी
डोळ्यात गोठली //१//

मनाचा हिंदोळा
झर झर झुले
आठवणीत या
मन माझे डुले //२//

मंजुळ आवाज
ऐकू येई कानी
येता मंद वारा
वारा गाई गाणी //३//

अंग अंग मोहरे
सुखाच्या स्पर्शाने
गंधाळून गेले
तुझ्या आभासाने //४//

दिलेली वचने
तोडली कशी रे
आज ही पाहते
वाट तुझीच रे //५//

शपथ आज मी
सख्या तुला देते
ओली सांजवेळ
ओलांडून जाते //६//

परवीन कौसर

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on कविता
शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित