राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थी घडतात” असे प्रतिपादन गंगाखेड येथील श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा डॉ एम.डी.इंगोले यांनी रा.से.यो. विशेष शिबीराच्या समारोप प्रसंगी वाळके पोखर्णी येथे बोलताना केले. यावेळी त्यांनी आपल्या बहारदार कवितांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन व मार्गदर्शनही केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.बाळासाहेब वाळके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.दशरथराव गोपनर, श्री.प्रकाश नरवाडे उपस्थित होते.
उपप्राचार्य डॉ. दयानंद उजलंबे यांनी यावेळी डीजिटल भारत व विविध कौशल्य विकास यासंबंधी माहिती दिली.
हे शिबीर “भारतासाठी युवक व युवकांसाठी डीजिटल भारत” या संकल्पनेवर आधारित होते.
प्रारंभी या कार्यक्रमात सात दिवसीय शिबिराचा अहवाल डॉ प्रकाश सुर्वे यांनी सादर केला.
या शिबीरात राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त ‘स्वच्छता रॅली’ काढण्यात आली. तसेच या प्रसंगी नैसर्गिक साधन संपत्तीच्या सर्वधनाचा भाग म्हणून वीज बचतीचे महत्व जनजागरण रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.
या रॅलीचे उदघाटन जेष्ठ नागरिक श्री.बाळासाहेब वाळके, श्री.दशरथ गोपनर यांनी केले. या रैलीत पोखर्णी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
रॅलीमध्ये स्वयंसेवक व स्वयंसेविका उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या सात दिवसीय शिबिराच्या माध्यमातून श्रमदान, स्वच्छता अभियान, स्कूल कनेक्ट रॅली, वाचन चावडी, नवीन शैक्षणिक धोरण डिजिटल साक्षरता, राष्ट्रीय मतदार जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तद्वतच या शिबीरात प्रबोधन पर विविध विषयांवर व्याख्यानांचे, मनोरंजनपर व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी शिबीरार्थी स्वयंसेवकांना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत, उपप्राचार्य डॉ.दयानंद उजळबे, उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते, उपप्राचार्य डा.संतोष गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक श्री. भारत हतीअंबिरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री.प्रा.डॉ प्रकाश सुर्वे, प्रा.डॉ चव्हाण धनपाल यांनी परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800