Wednesday, March 12, 2025
Homeसाहित्यकविता : शेतकरी वराची व्यथा..

कविता : शेतकरी वराची व्यथा..

असती बाबा वीस एकर बागायतदार।
द्राक्ष ऊस डाळिंबाना नित्य बहार।।

झालो मी कृषीपदवीधर आवेशाने छान ।
करीन करियर काळ्या आईस देऊन मान।।

फुलविली शेती नवप्रयोगे जणू मधुबन l
कर म्हणती लग्न सारे प्रियजन।।

बाबा स्वतः गेले अनेक स्थळ विचारत ।
नकार मिळाला तरी हात पसरत ।।

पसरला पदर
म्हणती, लेक द्या हो लेक।
फुलागत सांभाळीन
हौस पुरवील प्रत्येक ।।

पण जे ते म्हणती,
हवे पुणे, मुंबई शहर ।
नोकरी हवी पगार हवा
सहा अंकी तर।।

पैकेज जरी असे माझे तीस एक लाखाचे ।
कवडी मोल ठरे माझा बंगला,
चार चाकी वरदान काळ्या आईचे।।

हाच विचार करतो मी पुन्हा पुन्हा।
शेती मध्ये करियर करतोय
हा का माझा गुन्हा?।।

करावी क्रांती सारस्वतानी
चालवावी धारदार लेखणी,
कैवार होऊनी।।

शेती खेडे यांचे सकारात्मक व्याख्यान ।
शुद्ध हवा निर्मळ दूध ताजे भाजीपालाचे गावे गान ।।

प्रेमळ खेडूत –
आरोग्याला काय हवे आता।
सारस्वतानो उचला लेखणी आता ।।

— रचना : अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. शेतक-यांकरता हा पण एक मोठा प्रश्नच आहे हे लक्षात आलं. तो आपण कवितेतून खूप छान पध्दतीने मांडला आहे.

  2. शेतकऱ्यांची व्यथा अगदी सुंदर प्रकारे मंडळी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम