१
कुणाचे डोके ?
बुटात वाके !
पक्षी घालतो
जीवन झोके.

२
गोर गरिबांची गती
ही देशाची परिणिती
अर्थ व्यवस्था काय सांगता
चप्पल सांगे काळगती

३. स्वातंत्र्य पहा.
चिमण्यांनो या, स्वातंत्र्य पहा
स्वातंत्र्याचे गीत गात रहा
आपला देश, आपली भूमी
लोकशाहीत आनंद पहा

४
कितीही असो बुध्दीमत्ता
शेवटी बायकोची सत्ता
मोटरसायकल तुमची
पण काय कराल आत्ता.

— रचना : गज आनन म्हात्रे. करावेगाव, नवीमुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800