यूकेमध्ये एमबीबीएस नंतर अभ्यासाच्या संधींवर एक ऑफलाइन सेमिनार आयएमए नागपूर येथील डॉ. हरदास मेमोरियल सीएमई हॉलमध्ये नुकतेच झाले.
हे सेमिनार आयएमए नागपूरने कोमहॅड, आयएमए-एमएसएन महाराष्ट्र आणि आयएमए जेडीएन महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूरने COMHAD, IMA MSN महाराष्ट्र आणि IMA JDN महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन (BAPIO) चे संस्थापक अध्यक्ष, यू के तील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. रमेश मेहता OBE यांनी या सेमिनारचे आयोजन केले होते.
आयएमए नागपूरच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा गिरी यांनी स्वागतपर भाषण केले.
COMHAD चे कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर यांनी आपल्या प्रास्ताविकात COMHAD च्या उपक्रमांवर आणि ते इच्छुक विद्यार्थ्यांना कशी मदत करते यावर प्रकाश टाकला.
या प्रसंगी COMHAD UK च्या ई-जर्नल 🇬🇧 चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याच्या मुख्य संपादक डॉ. छाया प्रसाद आहेत.
डॉ. प्राची कोठारी यांनी त्यांचा प्रवास सांगून प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
आयएमए नागपूरच्या सचिव, काॅमहैड च्या सरचिटणीस डॉ. प्राजक्ता कडूसकर यांनी कामकाजाचे संचालन करून आभार प्रदर्शन केले.
श्री प्रतीक दाबीर, राज्य सरचिटणीस, आयएमए- एमएसएन महाराष्ट्र, डॉ. प्रतीक गोंड, संयोजक, आयएमए जेडीएन महाराष्ट्र
शेवटी, आयएमए जेडीएन महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस डॉ. चिन्मय आकरे यांनी संवादात्मक सहभागाबद्दल उपस्थितांचे आभार मानले.
या सेमिनारला लेखवर्धिनी प्रकाश, संयोजक, आयएमए- एमएसएन महाराष्ट्र, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. छाया प्रसाद, डॉ. अरुण प्रसाद, डॉ. एम.एस. रावत, डॉ. कमलाकर देवघरे, डॉ. सुनील खापर्डे, डॉ. प्राची कोठारी, डॉ. सुधीर मंगरुळकर, डॉ. बिपिन मेहता आदी मान्यवर तसेच १५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800