Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यनव्या कवयित्रीच्या काही कविता

नव्या कवयित्रीच्या काही कविता

नमस्कार मंडळी.
आज आपल्या पोर्टल वर नागपूर येथील कवयित्री, कोमल फलके यांच्या काही कविता प्रथमच प्रसिद्ध करीत आहे.

परिचय-
कोमल फलके यांचे शिक्षण बी कॉम, एम ए इंग्लिश लिटरेचर इतके झाले आहे. नवभारत मध्ये त्या 2012 पासून लिखाण करीत असून, त्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम करीत असतात.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

१. एक थेंब

या अथांग सागरातील
मी केवळ एक थेंब आहे
माझ्यात हा सागर नसून
मी च सागरात आहे
वाटेत माझ्या कुणी नसूनही
मीच माझ्यात आहे
संपला तो प्रवास नदीतून
आता सागरात अंत आहे

नको मला हे थांबणे
नको मला ही बंधने
त्या नदीतील थेंब होऊन
हवे मला ते संथ वाहणे
या अथांग सागरातील
मी केवळ एक थेंब आहे
माझ्यात हा सागर नसून
मी च सागरात आहे

जन्म मरण केवळ हे
नसे जरी हातात माझ्या
या मध्यंतरी चे आयुष्य
मला अंगसंग आहे
नको मला हे थांबणे
नको मला ही बंधने
माझ्यात हा सागर नसून
मी च सागरात आहे

सूर्य अस्ताचा असो
वा मावळता आहे
किरणांनी मला सामावून
ओटीत तुझ्या घे
नभास माझी थेंब भेट
एक महत्वाची आहे
माझ्यात हा सागर नसून
मी च सागरात आहे

या अथांग सागरातील मी
केवळ एक थेंब आहे
माझ्यात हा सागर नसून
मी च सागरात आहे
नको मला हे थांबणे
नको मला ही बंधने
वाटेत माझ्या कुणी नसूनही
मीच माझ्यात आहे

२. मनमौजी

हा ग्रीष्माचा तडाखा
लावी सौंदर्याची वाट
अजून चालेल किती
दिवस हा नवाबि थाट

हिरवेगार चोहीकळे
तरी वाटे ऊन बळे
खर्च वाढे वायफळे
वीज पुरवठा कमी पळे

आतुर माझे मन कवडे
तुडूंब भरून घेण्या पावसळे
जिथे कुठे हे गार पडे
गार गार होऊ चला गडे

होऊण जरा मंनमौजी
लावू उडी त्या तळी
पळवुनी ग्रीष्माचा तडाखा
मन हे आंनदाने उसळी

३. शिस्त

नको तिथे गती गेली
विद्ये विना मति गेली
वाट चुकता कोणीही
सोबतीची जाण नाही

सवंगळ्यांचे दिशेने
नाद लागता उधाने
शिस्त असावी एक
जनमानसा अनेक

शिक्षा नको पुस्तकी
असावी जाण आवकी
का कुणाचा कुठवर
देहबुद्धी शाबूत कर

घे कवेत आसमंत
झेलू मना सर्व खंत
आशिष देतो निसर्ग
या घडवू असा वर्ग

४. स्वीकार

जे गेले ते परत आणायला
तो देह काही वस्तू नव्हे
आहे जे ते जगायला
तुझ्यात बळ मात्र नक्की हवे

मान्य कर तुझा काळ
सज्ज हो स्वीकारूनी
पूर्ण केली तू जी माळ
कर विसर्जन शांतमनी

हक्क कोणाचा कुणावर
नको ते सर्व बाजूला सार
तूच हो सक्षम दिशा दाही
रणांगण उभे दारी कर पार

अस्तित्वाची जान ठेवुनी
वाट उभी कर सातत्याने
संघर्षाला तू मात देऊनी
यश साथ असुदे प्रार्थनेने

घे स्व भरारी उंच च उंच
येऊ दे खांद्यावर भार
निपचित पळू दे दारिद्र्य
तुझे वार ठरू दे धारदार

५. आशेची पालवी

अंधुकाला मार्ग दाखवू
जगण्यास ही कारण देऊ
सह सामर्थ्याने च घडऊ
आशेची पालवी फुलवू

देव दाखवू बाहेर मंदिराच्या
दोन पावले मठ उभारू
प्रश्न सोडवू प्रत्येकाचा
आशेची पालवी फुलवू

निरोगी असे घर प्रत्येकाचे
वाट निराधारांना दाखवू
एक एक रुपया जोडू
आशेची पालवी फुलवू

संस्काराचे बीज पेरूनी
मायपित्यास शरण जाऊ
नित्य घेऊ अनुभव सुखाचा
आशेची पालवी फुलवू

६. लेखन खुणा

साहित्याचा आधार सुंदर
विश्वव्याप सत्यची आहे
निनाद एक अमाप उदर
या शब्दचा वारसा आहे

कितीही वेचले झोळीत
वृक्ष हे भव्य दिव्य आहे
शब्द एक एक तो कुशीत
सामावूनच मी घेत आहे

न सहज कुणाचेही भाव
न सहज कुणाची व्यथा
एवढीच गुंतागुंत ही धाव
लिहिण्या कुणाची गाथा

ठेवताना मन ते कुणाचेही
दिले जे शब्द प्रेम भावना
मदत एकमेव साहित्य तेही
माझ्याच ठरल्या लेखन खुणा

कोमल फलके

— रचना : कोमल फलके. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments