स्वतः सोलापूर महानगर पालिकेच्या सेवेत असलेले अभियंता श्री विजय लोखंडे यांच्यावर मी लिहिलेला “उत्कृष्ट महापालिका अधिकारी : विजय लोखंडे” हा मी गेल्या महिन्यात लिहिलेला लेख आपण वाचला असेलच. श्री लोखंडे हे केवळ उत्कृष्ट अभियंता, अधिकारी, उत्कृष्ट नगर रचनाकार नसून उत्कृष्ट साहित्य रचनाकार देखील आहेत. संत सावता माळी यांच्या अभंगातून प्रेरणा घेऊन लिहिलेला हा “नगर अभियंत्याचा अभंग” आपल्याला नक्कीच आवडेल.
— संपादक
आमची अभियंत्याची जात
विकासाचे शेत लावू बागाईत
रस्ते पूल धरणे अवघी विठाबाई माझी
पाणी पुरवठा, रस्ते पदपथ ड्रेन
व्यवस्था सारी
अवघा झाला माझा हरि
स्वकर्मात व्हावे रत
मोक्ष मिळे हातो हात
अभियंत्याने केला विकास मळा
विठ्ठल देखियला डोळा
एस्टीमेट गणित मोजमापे धर्म
सोपे वर्म विकास कामे घेता
तीर्थव्रत विकास दान
अष्टांग याचा पांग आम्हा नको
प्रपंची असूनि परमार्थ साधावा
होऊनी नागरी सोयी प्रदाता
वाचे आळवावा पांडुरंग
बांधकाम, ओळींबां, पाइप, पाणी,
टाकी, ड्रेन, रस्ते काँक्रिट,
नगररचना विकास कामे वसवू शहरी

— रचना : विजय लोखंडे. सोलापूर
विभागीय अधिकारी, सोलापूर महानगर पालिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ ☎️ 9869484800
अप्रतिम कविता शहराचे रूपरेखा बदलून टाकण्याचे काम व्यवस्थित रित्या आपल्या कवितेतून मांडले आहे, 👌👌👌👌👷👷
उत्कृष्ट काव्यरचना. स्थापत्य अभियंत्याच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन खूप छान मांडले या कवितेमधून. 👌👌👌