नमस्कार, मंडळी.
गेल्या आठवड्यातील बातम्या, लेख, यशकथा, साहित्य, कविता यांच्याविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रियांमधील निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे. या सर्व प्रतिक्रिया बोलक्या असल्याने वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. असाच लोभ असावा. आपला पुढील आठवडा आनंदाचा, आरोग्याचा जावो, या हार्दिक शुभेच्छा.
आपली
टीम एनएसटी.
न्युजस्टोरीटुडे मधील विविध प्रकारचे सर्व लेख, वृत्तांत खुप सुरेख आणि वाचनिय असतात. संत कबीर यांच्यासंबंधीचा नितीन सप्रे यांचा लेख सुंदर होता. मनाचे सामर्थ्य हा डाॅ.अंजुषा पाटील यांचा लेखही भावला. अन्य साहित्यही दर्जेदार असल्यामुळे न्युजस्टोरीटुडे आगामी काळात चांगली झेप घेईल, यात शंकाच नाही.
– शेषराव वानखेडे. जेष्ठ पत्रकार, नवी मुंबई. 🙏
रश्मी हेडे यांनी केलेले “आतले आवाज” हे लिखाण एका वेगळ्याचं जगात घेऊन जातं. त्यांनी मनुष्य प्राण्याच्या मनाच्या वेदना अत्यंत वेगळ्या पण स्पष्ट भाषेत मांडल्या असून खरंच आयुष्यात जगताना महिलांना अनेक प्रकारची माणसं भेटतात. खासकरून
लग्नाआधीची व लग्नानंतराची माणसं, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी या सर्वांशी जुळवून घेताना, प्रत्येक नात्याला न्याय देताना प्रत्येक मनुष्य प्राण्यास अशीच भूमिका निभवावी लागते. मात्र आपण ते कधीही व कोणापुढेही उघड करत नाही. पण रश्मी हेडे यांनी हे धाडसाने सर्वासमोर मांडून एक वेगळीच किमया केलीली आहे. त्यांच्या लिखाणाला तलवारी सारखी धार येऊ देत व उत्तम प्रकारचं लिखाण होऊ देत हीच आम्हा साताराच्या सखीची मनापासून इच्छा, आपलं अभिनंदन व कौतुक.
– सौ. आशा अशोक कुंदप, सातारा.
‘अन्वय : आशेचा किरण‘ हे आमच्या व्यसनमुक्तीच्या कामाविषयीचं फिचर खूप आवडलं.
शीर्षकापासून ते समारोपापर्यंत आपल्या संपादन स्रुजनाच्या सुंदर खुणा लेख वाचनस्नेही करत जातात.
हा लेख आम्हा सर्वांचा उत्साह, हुरूप वाढवणारा आहे.
आमच्या कामाला व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दल
आम्ही सर्व कार्यकर्ते आपले ऋणी आहोत.
अजित मगदूम, नवीमुंबई.
आदरणीय प्राजक्ता लवंगारे- वर्मा मॅडम नागपूरच्या विभागीय आयुक्त पदी नियुक्ती झाल्याची बातमी तपशीलवारपणे देऊन तसेच अल्प परिचय चांगल्या लेखन शैलीत देऊन आपण फार मोठे काम केले आहे. न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल आम्हाला खूप आवडते. याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ….
– विलास सरोदे, औरंगाबाद.
प्रणिता देशपांडे यांचा “नेदरलँड्सची राजकुमारी“, हा लेख आपल्याला तेथील राजघराण्याविषयी आणि तेथील विद्यार्थ्याविषयी, त्यांच्या पदवी शिक्षणाबद्दलची एक वेगळीच आणि आणि सुंदर अशी माहिती पुरवतो. राजकुमारी विषयी माहिती पण अर्थपूर्ण. या आणि अश्या लेखांमुळे आमच्या ज्ञानात मौल्यवान भर पडत आहे. 🙏🙏🙏
मोनिका ठक्कर यांची डॉक्टरेट आणि ती पण विदूषक या विषयाबाबत वाचून खूपच नवल वाटले. त्यांचे विविध विषयातील ज्ञान आणि एकूणच संपादन केलेल्या पदव्या पाहून त्यांच्या कर्तुत्वाला सलाम. मेघना साने यांनी विस्तृत केलेल्या या माहितीबद्दल त्यांचे पण आभार. ❤️❤️❤️
इंग्लंडच्या आजीचे साकडे पण मनाला भावले. सगळ्यांच्याच मनातील भावना त्यांनी उत्कट रीतीने मांडल्या आहेत. आणि लीना फाटक यांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. 🙏🙏🙏🙏
असेच सुंदर सुंदर लेख सादर केल्याबद्दल संपादकांचे आभार 🙏🙏🙏🙏🙏

-मानसी लाड, चेंबूर
खरंच, भुजबळ साहेब,
आपले सरप्राइज देणारेच झाले सरप्राइज अप्रतिम विचारांची रचना आणि डॉ भरत वाटवानी यांच्या सेवाभावी सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेल्या सरप्राइज बद्दल संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन !!
– राजाराम जाधव, निवृत्त सहसचिव, महाराष्ट्र शासन.
🌹🌹😌😌🤠🤠👍👍
न्यूजस्टोरीटुडे चे संपादक, मा. देवेंद्र भुजबळ, यांच्याकडून दररोज मिळणारी न्यूजस्टोरीटुडे ची लिंक म्हणजे, वाचकांसाठी एक वेगळी पर्वणीच असते.
देवेंद्र भुजबळ यांचा प्रशासकीय सेवा, पत्रकारिता यातील प्रदीर्घ अनुभव पदोपदी या पत्रामध्ये दिसतो. प्रशासकीय सेवा, राजकारण, समाजकारण, ग्रंथ, कविता अशा सर्वच विषयांवरचे उत्तम लेख यामध्ये वाचायला मिळतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या माणसांविषयी वाचायला मिळतं.
हल्लीच्या निराशाजनक काळात अशा माणसांबद्दल वाचायला मिळणं म्हणजे मनाला एक उभारी !
डिजिटल माध्यमाला धरून लेखकांची आणि असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींची व्यक्ती चित्रणे पण असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने चेहरा मिळतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
काही सुंदर कविताही वाचायला मिळतात.
त्या त्या दिवसचे औचित्य साधून दिनविशेष असतात. खरंच, कोणताही दिन विशेष करणारं असं हे डिजिटल नियतकालिक म्हणूनच वाचकांना जवळचं वाटतं.
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
डॉ. मृण्मयी भजक. सूत्रसंचालक, लेखिका.
देवेंद्र भुजबळ यांच्या मुळे सदासर्वदा आनंदात राहणारे आणि कुणाला ही मदत करण्यासाठी तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते विलास सरोदे यांची ओळख झाली. परिचय झाला आणि त्यांच्या बरोबर राजस्थानातील माउंट अबू येथे प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात आठवडाभर आणि आय आर सी टी सी संचालित दक्षिण भारतातील पर्यटन स्थळ दर्शनाच्या वेळी दहा दिवस देवेंद्र भुजबळांसह एकत्र होतो.
या दोन्ही प्रवासात मला अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने वागवणारे मित्र विलास सरोदे भेटले. आय आर सी टी घ्या दक्षिण भारतातील प्रवासात मला फुड पॉयझन झाल्यामुळे मी आजारी असताना विलास सरोदे यांनी मला सतत आधार देणे, माझ्या बॅगा उचलणे, मला डॉ. कडे नेऊन औषधोपचार करणे, मोठ्या भावाच्या नात्याने मला सतत मदत करणे यामुळे आपल्या आयुष्यात जी काही चांगली आणि जबरदस्त माणसे भेटली त्यांच्या यादीत विलास सरोदे यांचं नाव ठळकपणे स्मरणात राहील.
विलास सरोदे हे शासकीय सेवेत असुन सुद्धा अत्यंत निगर्वी, निस्प्रुह आणि संयमी स्वभावाचे आहेत. आपल्या समाजबांधवांना एकत्र आणण्यासाठी आणि समाजाचं भलं होण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्यामुळे साळी समाजबांधवांच्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आहेत. माझ्या या सद्गुणी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभचिंतन.
– राम खाकाळ, माजी निर्माता दिग्दर्शक लेखक मुंबई दूरदर्शन.
तणाव रहीत जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार ठेऊनच जीवन जगले पाहिजे. मनात सकारात्मक विचार आणण्यासाठी लेखिका डॉ. अंजुषा पाटील यांनी उत्तम उपाय सांगितले आहेत त्याबद्दल त्यांचे आभार.

– मोहन आरोटे. कल्याण 🙏
मनःपूर्वक धन्यवाद. असाच लोभ कायम असू द्या.
सामाजिक बांधिलकी मानून आपण दररोज न्यूज स्टोरी टुडे या माध्यमातून मनाला नवी चेतना देण्याचे काम करीत आहात याचा आम्हाला खूप खूप आनंद वाटतो आहे. जनमानसामध्ये न्यूज स्टोरी टुडे चे काय स्थान आहे हे प्रतिक्रियांच्या माध्यमातून कळून आले आहे. या प्रतिक्रियांमध्ये शेषराव वानखेडे ज्येष्ठ पत्रकार नवी मुंबई, सौ. आशा अशोक कुंदप, सातारा, अजित मकदम, नवी मुंबई, मानसी लाड, चेंबूर, राजाराम जाधव निवृत्त सहसचिव आदींच्या प्रतिक्रिया आवडले आहेत.
आम्हा वाचकांसाठी न्यूज स्टोरी टुडे मधून दररोज उत्साह वाढविणारी वैचारिक मेजवानी मिळते आहे. प्रत्येकाच्या हृदयातील स्थान किती उच्चकोटीचे आहेत हे दिसून येत आहे. नवनवीन स्टोरी वाचण्यासाठी आम्ही सदैव उत्सुक आहोत..