प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी तरी
खास असतच नाही का
अगदीच खास अगदीच मनातुन
सर्व वेळ आणि हृदयाचा ताबा
त्यालाच बहाल केलेला
त्यालाच समर्पित केलेली हर एक भावना
दिवसाची पहिली किरण नी संध्येची मावळती तीच
त्याच्याच आठवणीने सजलेली रात
हसणं रडणं चिडणं सगळं त्याच्यासाठी
जणु पासवर्डच तो आपल्या दैनंदिनीचा
त्याला पाहुन आलेलं नजरेचं तेज
त्याला स्पर्शून फुललेली काळजाची घालमेल
त्याच्या सहवासात जाणा-या क्षणांचा
नी त्याच्या ओढीने अतुरलेल्या मनांचा
हिशोब लेखी असतो हं हृदयात
त्याच्याशी बोलताना कमी पडलेल्या शब्दांची
नी चालताना अडखळलेल्या पावलांची
सिमा किती कमीच असते ना
खळाळतं ऊधाणच असतं अगदी त्याच्या सहवासात
बस गजानना डोळ्यात सागराची भरती तर तेव्हा येते रे जेव्हा एक अनोळखी वादळ त्याला
आपल्यापासुन सहज हिराऊन नेतं अगदी आपल्या डोळ्यापुढून…….
– रचना : गजानन ऊफाडे.
शब्दश्री