हुंदर पासून पुढे पाकिस्तान लगत भारताचे शेवटचे गाव थांग व तुरतुक या गावानां भेट देण्यासाठी आम्ही निरभ्र सकाळी मार्गस्थ झालो. भारतीय सेनेने १३ ऑगस्ट १९७१ रोजी एका रात्रीत तुरतुक हे पाकिस्तान हद्दीतील गाव काबीज केले होते. तेरा ऑगस्टला झोपी गेलेले पाकिस्तानातील हे गाव जेंव्हा सकाळी उठले त्यावेळी भारताच्या ताब्यात असल्याचे सैनिकांनी तेथील गावकऱ्यांना सांगितले. याच गावालगत पाक हद्दीतले फ्रनू गाव नजरेने दिसते. येथूनच आम्ही पाकिस्तानी लोकांना आरोळी देत हात वारी करताच तेही प्रतिसाद देत होते.
यागबो पॅलेस : थांग नजीक तुरतुक गावात बाल्टिस्तान संस्कृती पहायला मिळाली. बाल्टिस्तान वंशाच्या यागबो राजाने या गावात पॅलेस बांधला होता.

तेथील सर्व बांधकाम बाल्टिस्तान शैलीत आहेत. आजही तेथे राजाचे वंशज राहतात. ते आजपर्यंत भारतीय सैनिकांनां भाजीपाला, फळे पुरवठा करतात. या वंशजांना मिलीटरी मार्फत विविध पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या वंशजांना पाकिस्तान की भारतात स्थाईक होणार असे विचारले असता त्यानी भारताला पसंती दिली होती. सबब पाक सैन्याने जाणीवपूर्वक या पॅलेसचा ताबा घेतला. पण जवळपास अकरा वर्षाच्या हायकोर्ट केस लढाई नंतर पाक कडून ताबा मिळवण्यात त्यांना यश आले. तथापि पाक सैनिकांनी ताबा सोडताना जाणीवपूर्वक या पॅलेसची तोडफोड केली.

तूरतुक परिसरातून शोक (Shoyk) नदी वाहते. ही नदी पुढे पाक हद्दीत शिरते.

परतीच्या प्रवासात सियाचीन युद्धातील शोक वॉर मेमोरिअल पाहून आम्ही हॉटेलवर परतलो.
क्रमशः

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800