नमस्कार मंडळी.
मूळ कवितेत कवीने “मोलकरणी” हा शब्द वापरला होता. पण मला ज्यांच्या सहकार्याने आपले घर चालते त्यांना, “मोलकरणी”, “बाई” “कामवाली”, “कामवाली बाई” असे म्हणणे कधीच आवडले नाही. त्यात आज “मोलकरणी” या विषयावर कविताच प्राप्त झाल्याने “मोलकरणी” या शब्दाऐवजी मी “घर सखी” हा शब्द योजला आहे. नाही तरी किती तर सुखाच्या दुःखाच्या प्रसंगात ही घर सखी अनेक गृहिणींची खरी खुरी सखी होतच असते. आशा आहे की, आपल्याला ही हा शब्द आवडेल आणि आपणही तो वापरू लागाल. लाखो करोडो संसार व्यवस्थित चालत रहावे यासाठी सर्व घर सख्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांचे आणि त्यांच्या मुलाबाळांचे जीवन घडविण्यासाठी आपणही त्यांना हातभार लावू या.
— संपादक
घर सखीची ऐका हो
कधी तरी व्यथा
रोज घडते तिच्या घरी
एक नवी कथा
कुणाचा नवरा, कुणाचा मुलगा
करीत असतो व्यसने
म्हणूनच नशिबी तिच्या येते
तुम्हाकडे भांडी घासणे
केवढे अन्न विनाकारण
आपले वाया जाते
उपाशी पोरे निजलेली
मन तिचे हेलावते
उधळ पट्टी आपल्या मुलांची
तिजला पाहवत नसणार
एकटीच्या पगारात
कुटुंबाचे कसे भागत असणार
लादी पुसण्यासाठी
असेल का तिच्यात जोर
पाळणा हलवितो नवरा
वर्षांनी हरामखोर
चार घरातली कामे करता
जाते बिचारी थकून
बेवडा पती मारतो
तिजला काहीही फेकून
घ्यावी मनापासून समजून
एकदा तिची कुचंबना
करावी मदत तिच्या बाळांना,
होईल दूर विवंचना
यशस्वी पुरुषामागे असतो
स्त्रीचा हाथ अन्
नोकरी करणारीच्या मागे,
असते घरसखीची साथ

— रचना : गजाभाऊ लोखंडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान 👍👍
are wa ! sunder
घर सखी कवितेतून सामाजिक समतेचा संदेश मिळतो.