बालरंग भूमी परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे नुकताच वारकरी भवनात शालेय विद्यार्थ्यांकरता आषाढ वारी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुढील पिढीला संस्कृतीचा वारसा कळायला पाहिजे, वारीचे महत्व, परंपरा, विठ्ठल आणि रखुमाईची कथा, अध्यात्म म्हणजे काय ? याची तोंड ओळख होण्यासाठी अभंग आणि गवळणी आणि गायन भजन वेशभूषा यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ८ ते १२ बारा वर्षे आणि १२ ते १६ वर्ष या दोन वयोगटातील विद्यार्थ्यांनी हे कार्यक्रम सादर केले.

आषाढी वारीला संयुक्तिक वेशभूषा स्पर्धा देखील यावेळी विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांनी तयारी जय्यत केली होती. कामाचा दिवस असूनही आई-वडील, आजी आजोबा, नातेवाईक यांच्या सोबत विद्यार्थी कार्यक्रम सादर करायला आले होते.
याप्रसंगी श्रीयुत देसाई सर आणि सौ शुभांगी पासेबंद, यांनी परीक्षकांचे काम बघितलं. “बक्षीस काय मिळतच राहतील, आज नाहीतर उद्या मिळतील. केवळ बक्षीस मिळवणं हा उद्देश नसून, आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख होणं, आपल्याला या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणे, जास्ती महत्त्वाच आहे” असं यावेळी शुभांगी मॅडमनी सांगितलं.

समूह गायन आणि नृत्य कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून अनुक्रमे हेमंत साने आणि पंकज पाडाळे यांनी काम बघितलं .
याप्रसंगी ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. सौ मंजुषा बल्लाळ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मेघना साने यांनी विविध शाळेतील विद्यार्थिनींकडून संयुक्तिक अशा ओव्यांच्या गायनाचा बसवून घेतलेला कार्यक्रम देखील याप्रसंगी सादर झाला. विद्यार्थ्यांनी पेटी तबला पखवाज यांच्या साथीने अभंग ओवी भारुड भजन सादर केली. आपल्या ह्या लोककला आणि पारंपरिक लोकगीतांमध्ये मनोरंजना बरोबर एक संदेश देखील दिला असतो.

सा रे ग म प विजेता अभिजीत कोसंबे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. श्री मंदार टिल्लू यांनी बालरंग भूमीबद्दलचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, पी एन पाटील सर, प्रांजली गंधे मॅडम, राजेश जाधव, दयानंद पाटील सर, नूतन बांदेकर, सुचेता रेगे, नितीन चव्हाण, भारती सोनगीर, जयश्री इंगवले यांनी सहयोग दिला. पण खरा सहयोग तर विद्यार्थ्यांनी भरघोस उपस्थिती दाखवून आणि दाद घेऊन दिला. रोटरी क्लबचे या कार्यक्रमाला सहकार्य मिळाले होते.
विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला वंदन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800