“अहिंसा”
मंडळी, अहिंसा हा शब्द आपण उच्चारला की डोळ्यासमोर येतात त्या शौर्याच्या गाथा आणि मौनाचे मथळे. अहिंसा ही बऱ्याच वेळा इतिहासाच्या चरख्यामध्ये चुरगळलेली असते.
अमेरिकेत बोस्टन जवळ नॉर्टन गावात राहणाऱ्या ज्योती जोशी यांनी 1967 मध्ये काढलेल्या “द मॅन अँड द मशीन या चित्राकडे बघून असेच काहीसे विचार माझ्या मनात आले. 1975 मध्ये हे चित्र ज्योतीताईंकडून एका दर्दी रसिकाने विकत घेतलं आणि आता ते माल्बोरो गावात प्रायव्हेट कलेक्शन मध्ये आहे.
या चित्रातून दिसणारी यंत्रवत माणसं, ओढली जाणारी शरीरं आणि भावनाहीन चेहरे यांनी मला आठवण करून दिली की शांतता ही कधी कधी दुसऱ्या प्रकारची हिंसाच असते. ही कविता एक गहन सामाजिक टिप्पणी जरी असली तरी ती केवळ शब्दांचीच नव्हे, तर मौनाची ही कविता आहे.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे 👇खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
