ठाणे येथील महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात नुकतीच “पत्रकारितेची पाठशाळा : बातमी मागची गोष्ट” अशी एक दिवसीय पाठशाळा घेण्यात आली.
पत्रकारांची शाळा घेणे म्हणजे फारच हिंमतीचे काम असतं, असा एक हलकाफुलका आणि विनोदी चिमटा घेणारा विचार एका वक्त्याने व्यक्त केला. जिल्हा, विभागीय माहिती कार्यालय, ठाणे महानगरपालिकेचा जनसंपर्क विभाग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांना नवे ज्ञान मिळावं म्हणून ही पाठशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रशासकीय दृष्ट्या निवृत्त झालेले, पण सतत कार्यरत असलेले देवेंद्रजी भुजबळ निवृत्त संचालक माहिती हे या पाठशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी होते. त्यांच्या सोबत डॉक्टर मोना पंकज यांनी ताण-तणावाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं. विजयकुमार कट्टी यांनी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या टेरेस गार्डनची माहिती दिली आणि व्हिडिओ दाखवला. झाडे आवश्यक असतात पण जागा नसते. पण अगदी छोट्या जागेत, त्यांनी भरपूर झाडे लावली आहेत. एका छोट्याशा खोलीत ३ हजार झाडे लावण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. कट्टी सर हे जणू एक चालते बोलते झाडच आहेत. धकाधकीच्या जीवनात माणसांना नेहमीच ताण येतो असतो. त्यात पत्रकार म्हटल्यावर तो वाढतोच.
जे पत्रकार वृद्धत्वाच्या वाटेवर आहेत ते हे जाणतात की पत्रकारांची परिस्थिती दिवसेंदिवस कशी बदलत चालली आहे.
पत्रकारांनी अद्ययावत व्हायला पाहिजे. अगदी पुणेरी स्वच्छ शुद्ध भाषा हवी असं नाही किंवा अगदी तसंच बोललं पाहिजे, असं देखील नाही. पण भाषा ही शुद्ध ठेवावी. शुद्धलेखन शिकावं. अद्ययावत तऱ्हेने ऑडिओ टायपिंग किंवा लॅपटॉप वापरणं वगैरे गोष्टी शिकाव्यात, असा संदेश या कार्यशाळेत मिळाला.
जगण्याची स्वप्न संपली तर नाराज पुढची पिढी मागच्या पिढीला प्रश्न विचारते तुम्ही आमच्यासाठी काय केलं ? त्यामुळे ही जाणीव ठेवून पत्रकारांनी काम देखील करावं आणि अर्थव्यवहाराच्या बाबतीत देखील सजग राहावं. जनता आणि शासन यांच्यातील दुवा पत्रकार असतो. त्यामुळे शासन आणि पत्रकारांच्या सामंजस्य देखील आवश्यक असतं. आजची लक्झरी ही उद्याची गरज असते. म्हणजे आपण आज जे आरामदायी आहे म्हणून आपण स्वीकारतो, ते उद्या आवश्यक होतं. पूर्वी मोबाईल एसएमएस पाठवणं वगैरे, मेल करणे हे काही ठराविक लोक करायचे. आता ते सगळेच जण करतात. फार पूर्वीच्या काळी तर हाताने लिहून, नंतर प्रेस मधले छापखान्या मधले खिळे जोडून, पेपर बनवावे, छापावे लागत. अशा काळात देखील ज्या ज्येष्ठ पत्रकारांनी लिखाण केलं, ते देखील आता अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारून पुढे जात आहेत.

पत्रकारांना आरोग्याचे विविध प्रश्न येतात कारण अवेळी काम करावे लागत. अतिप्रकाश असू शकतो किंवा कमी प्रकाश असू शकतो. भयानक आवाजात काम करावे लागत. कधी लांब वर प्रवास करावा लागतो. रस्ते चांगले नसतात. रिक्षात बसले की मान पाठ कंबर दुखते. ज्या दुखण्याला आज थोडी थोडी सुरुवात आहे ते पुढे वाढु शकते, म्हणून थोडा थोडा वेळ ब्रेक घेत जावा. डोळे झाकून दोन मिनिटे बसावं. फोन सतत हातात घेऊन, हात दुखून येतो. मोबाईल स्टॅन्ड वर लावून ठेवावा. रोज सात तास झोपाव. आपलं पोश्चर जपायला पाहिजे. आवश्यक तिथे उशी वापरावी.
नात्यांमध्ये समाधान असलं तर माणूस अधिक सुखी होतो. त्यामुळे वाद विवाद वाढवू नये. सर्वांना समाधान मिळेल अशी औपचारिक नाती आणि अनौपचारिक पर्याय जे उपलब्ध असतात त्यानुसार पर्याय शोधून, पत्रकारांनी आपल्या प्रश्नांची सोडवणूक करावी. पत्रकारांच्या आरोग्यासाठी शंकरराव चव्हाण आरोग्य निधी आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. म्हणजे पत्रकारांसाठी असलेल्या सुविधा यांचा देखील उल्लेख या कार्यशाळेत करण्यात आला.
श्री देवेंद्रजी भुजबळ, डॉक्टर मोना पंकज, सौ अर्चना शंभरकर मॅडम, श्रीयुत उमेश बिरारी यांनी कार्यक्रमात सहभागी पत्रकारांना मार्गदर्शन केलं.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पत्रकार संघटनांचे प्रमुख सर्वश्री कैलास म्हापदी, संजय पितळे, मनोज जालनावाला, आनंद कांबळे, दीपक सोनवणे या सर्वांनी या पाठशाळेत विचार व्यक्त केले.
एक दिवसाच्या पाठशाळेने ताजेतवाने होऊन, रोजच्या कामासाठी, मोबाईल बॅटरी फुल रिचार्ज करावी, तसे रिचार्ज होऊन आम्ही सर्वजण तिथून बाहेर पडलो.

— लेखन : शुभांगी पासेबंद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
श्री. देवेंद्र भुजबळ हे उत्तम वक्ता आहेतच. आनंदी जीवनाच्या सर्व मुद्द्यांच्या विचार करून ते उत्तमरित्या मांडले आहेत. श्री मारुती विश्वासराव. यांनीही ते सुरेख शब्दबद्ध करून वाचकापर्यंत पोहोचविले आहेत. दोघांचेही अभिनंदन.
… नीला बर्वे.,
सिंगापूर.
श्री. देवेंद्र भुजबळ हे उत्तम वक्ता आहेतच. आनंदी जीवनाच्या सर्व मुद्द्यांच्या विचार करून ते उत्तमरित्या मांडले आहेत. श्री मारुती विश्वासराव. यांनीही ते सुरेख शब्दबद्ध करून वाचकापर्यंत पोहोचविले आहेत. दोघांचेही अभिनंदन.
… नीला बर्वे.,
सिंगापूर.
श्री. देवेंद्र भुजबळ हे उत्तम वक्ता आहेतच. आनंदी जीवनाच्या सर्व मुद्द्यांच्या विचार करून ते उत्तमरित्या मांडले आहेत. श्री मारुती विश्वासराव. यांनीही ते सुरेख शब्दबद्ध करून वाचकापर्यंत पोहोचविले आहेत. दोघांचेही अभिनंदन.
… नीला बर्वे.,
सिंगापूर.
श्री. देवेंद्र भुजबळ हे उत्तम वक्ता आहेतच. आनंदी जीवनाच्या सर्व मुद्द्यांच्या विचार करून ते उत्तमरित्या मांडले आहेत. श्री मारुती विश्वासराव. यांनीही ते सुरेख शब्दबद्ध करून वाचकापर्यंत पोहोचविले आहेत. दोघांचेही अभिनंदन.
… नीला बर्वे.,
सिंगापूर.