दररोज चालत रहा,
सकाळी संध्याकाळी,
रक्ताभिसरण वाढते,
येते तरतरी, हुशारी,
वेळ चांगला जातो,
भूक देखील वाढते,
आवडेल ते योग्य खावे,
शरीर सुदृढ राहते,
फिरताना शिकता येते,
नवी दृष्टी मिळते,
आपला परिसर,
आपुली माणसे,
नाते जोडले जाते,
फिरण्यास मिळाली सोबत,
तर हे पथ्य पाळा,
निश्चित ठिकाण येईपर्यंत,
दोघांनीं बोलणे टाळा
जे होऊन गेले ते गेले,
त्यावर चर्चा उगाच नको,
जे आज करावे वाटते,
ते सृजन करा लेको,
घर, समज, परिसर, देश
हीच व्याप्ती वर्तुळाची,
एक एक सुंदर, आनंदी करा,
घ्या जगण्याची प्रचिती…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800