“तांबरम”
काही गोष्टी टाळता येत नाहीत असे म्हणतात, ते माझ्याबाबत तांबरमला गेल्यानंतर एकेका घटनातुन लक्षात यायला लागले. माझा कोर्स मेट ढवळे यांनी मला तुला पोस्टिंगवर फरीदाबादच्या जवळच्या तुगलकाबाद येथे तांबरमला जायला आवडेल. श्रीराम म्हणून लॉजिस्टिक्स ऑफिसर होता. म्हणाला, सर तुम्ही तांबरमला पोस्टिंगवर जाण्याचे कसेही करून टाळा. सध्या तांबरममध्ये प्रचंड मोठा गोंधळ चालू आहे. २९ कोर्ट ऑफ इंक्वायरीज चालू आहेत. तिथला प्रत्येक ऑफिसर कुठल्या ना कुठल्या तरी एन्क्वायरीत फसलेला आहे. म्हणून तुम्ही तिकडे अजिबात जाऊ नका असे माझ्या भावाने म्हणजे ग्रुप कॅप्टन मुरलीधर यांनी मुद्दाम सुचवले आहे. विंग कमांडर ढवळेने बघतो काय मला करता येईल ते, असे आश्वासन दिले. काही दिवसातच पोस्टिंगचा सिग्नल आला की तुझी पोस्टिंग तांबरमला झाली आहे आणि जे मला कसेही करून टाळायचे होते ते नेमके माझ्या गळ्यात पडले.
आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे मी तांबरमला पावसाळ्याच्या तोंडावर पोहोचलो. पहिल्या दिवशी ए ओ सी ना भेटल्यावर त्यांनी मला विंग कमांडर रँकचे टिप्स खांद्यावर लावून प्रमोशनचा पेढा खाऊन म्हटले, तू असे कर की आता अकाउंट्स सेक्शनमध्ये जाऊच नको. माझ्या ऑफिसच्या शेजारी एक एन्क्वायरी चाललेली आहे त्यामध्ये तू सरकारी साक्षीदार म्हणून कोर्टात साक्ष दे. मला असे वाटले की मी जणूकाही पॅरा ट्रूपर असून जिथे लढाई चाललेली आहे तिथे एकदम हातघाईच्या मारामारीत टपकलो आहे. पुढे जवळजवळ दोन महिने मी कोर्ट मार्शल, एन्क्वायरी मध्ये असा काही गुरफटून गेलो की जणू काही मीच या एन्क्वायरी मधला खरा व्हिलन आहे. या एन्क्वायरीचे नंतर कोर्ट मार्शल मध्ये परिवर्तन झाले आणि ते कोर्ट मार्शल एकदा दिलेला निकाल बरोबर नाही असे म्हणून पुन्हा नव्याने जमले. इतके करून ज्यावर गुन्हा केल्याचा आरोप होता तो मोकाट सुटला. बाकीचा तपशील सोडता एवढेच म्हणतो की एका ग्रुप कॅप्टनने आपल्या पोस्टिंग क्लेममध्ये स्वतः ची कार आसाम मधून तांबरमला ट्रकमधून आणल्याचे दाखवून आणि त्याचे पैसे क्लेम केले. नंतर असे निष्पन्न झाले की याच्याकडे कारच नव्हती. यांनी खोटा क्लेम घातला म्हणून त्यावर कारवाई केली गेली.
मी तांबरम मध्ये पोहोचायच्या आधी एक विंग कमांडर कन्नन म्हणून अकाउंट ऑफिसर होते त्यांनी हा खोटेपणा पकडून क्लेम नाकारला होता. एन्क्वायरी चालू असताना विंग कमांडर कन्नन यांनी बाजू बदलून ते त्या ग्रुप कॅप्टनच्या बाजूने साक्ष देऊ लागले. मला पंचायत पडली की ज्यांनी हा क्लेम खोटा क्लेम पकडला तेच असे म्हणायला लागले की हा क्लेम चुकीचा नाही. असे काही विचित्र त्रांगडे झाले की माझ्या अकाउंट्स विषयातील अनेक रूल्स आणि रेगुलेशन घेऊन मला सरकारी साक्षीदार म्हणून माझ्या अकाउंट्स ऑफिसरच्या विरुद्ध साक्ष द्यावी लागली.
ही एक इन्क्वायरी होती अशा आणखीन 30 एन्क्वायरी एकाच वेळेला चाललेल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण स्टेशन मधील वातावरण अत्यंत तंग होते कोणीही कोणाची नीट बोलू शकत नव्हते कारण एक इन्क्वायरी करणारा दुसऱ्या इन्क्वायरीमध्ये अडकलेला होता. असो.
या पार्श्वभूमीवर नंतर नवीन एओसी आले आणि त्यांना या एन्क्वायऱ्या आणि इतर कटकटी यातून मार्ग काढण्याकरता काही महिने जावे लागले. यात सुमाराला म्हणजे साधारण जानेवारी 1994 ला मला नाडी ग्रंथ भविष्याची तोंड ओळख झाली. नंतर मी झपाटल्याप्रमाणे नाडी महर्षींच्या कार्याला वाहून घेतले. त्यामध्ये आलेले अनुभव माझ्या पुस्तकात सादर केल्यामुळे इथे मी ते देत नाही. भारतीय क्रिकेट टीम आणि मी ग्रुप कॅप्टन मुरली सुंदरम एक दिवशी माझ्या ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले, की यार तू आपल्या एअर फोर्स स्टेशनच्या क्रिकेट टीमचा मॅनेजर हो. मी आत्ताच एओसीच्या कानावर घातले आहे. मी चकित झालो कारण माझा क्रिकेटमध्ये संबंध उरला नव्हता. मुरली सुंदरम हे स्वतः क्रिकेटर होते. मी आपला बाहेरून क्रिकेट पाहणारा होतो. त्या वेळेला माझ्या व्यतिरिक्त आणखीन तीन ऑफिसर्स त्या क्रिकेट टीम मध्ये खेळत होते. त्यांना डावलून माझे नाव सुचवले कसे मी विचारतात ते म्हणाले की तुझ्या अकाउंट सेक्शन मधील सहा जण आत्ता टीम मध्ये आहेत. बाकीचे ऑफिसर्स खेळाडू आहेत परंतु त्यांचा एकमेकात पटत नाही, म्हणून मी तुझे नाव सुचवले आहे. नव्या तू इन्चार्ज झालेलाच आहेस. मला मान्य नव्हते. एओसींकडे हातपाय आपटत म्हणालो, अहो माझ्या डोक्यावर काय काय आणखीन ड्युटी देत आहात.
माझ्या सेक्शन मध्ये चार ऑफिसर्स असायला हवेत आणि आत्ता फक्त आम्ही दोनच आहोत. ३००० एयरमन असलेल्यांच्या पगार वाटप कामाचा भार आहे. तशात तुम्ही फार गळ घातली म्हणून मी सिव्हिलियन सोसायटीच्या कटकटीच्या वेगवेगळ्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी मला तुम्ही त्याचाही इन्चार्ज बनवले आहे. आता आणखीन ही नवी टोपी मला घालणे अशक्य आहे. एओसी सरदारजी एअर कमोडर एच एम सिंग मला म्हणाले, मला कल्पना आहे पण सध्याच्या अत्यंत नाजूक परिस्थितीत तूच हे काम करावे असे माझे म्हणणे आहे. मी चेहरा वाकडा करून परत आणि क्रिकेट टीमचा इन्चार्ज म्हणून कामाला लागलो. एक चांगले होते की माझ्या अकाउंट सेक्शन मधलीच सहा-सात एयरमन टीमध्ये चांगले खेळाडू म्हणून नाव कमावून होते. दर रविवारी आमच्या स्टेडियममध्ये किंवा इतर टीमच्या बरोबर आम्हाला मॅचेस खेळायला बाहेर जावे लागे. तेव्हा मी वेगवेगळ्या भागातील आमच्या ग्रुपच्या मॅचेस, तिथली मैदाने, क्रिकेटिंग गिअर जवळून पहात असे. बाहेरच्या टीम्स एअर फोर्स स्टेशनमध्ये खेळायला उत्सुक असत, कारण अगदी रेल्वेस्टेशन वरून आणायला न्यायला एयरफोर्सचा ट्रक तयार असे. खेळल्या नंतर नॉनव्हेज लंच आणि नंतर लाल पाण्याची सोय होत असल्यामुळे एअर फोर्स स्टेशन तांबरम हे इतर टीम साठी खूप लोकप्रिय आणि आवडीचे केंद्र होते.
काही महिन्यांनी तमिळनाडू स्टेट क्रिकेट असोसिएशनची निवडणूक झाली. आमच्या टीमच्या वतीने मी मतदान करायला युनिफॉर्म मध्ये गेलो होतो. त्यात भरत रेडीचे पॅनल कटाकटी निवडून आले. मधल्या काळात मला आठवते की चिन्मयला घेऊन मी चिपॉक स्टेडियमवर वेस्टइंडीज बरोबरची एक दिवशी मॅच पाहायला पैसे खर्च करून गेलो होतो. तेव्हा मला जर कोणी सांगितले असते की यानंतर तू मेन स्टेडियमच्या मध्यात कसोटी खेळाडूंच्या सोबत आणि कॉमेंट्रीटर बॉक्समध्ये जाऊन मानाने मॅचेस पाहायला मिळतील. तर ते त्रिवार अशक्य वाटले असते.
माझ्या जीवनात भारतीय कसोटी सामन्यातील क्रिकेटर्सशी भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे घडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण ते प्रत्यक्षात आले. सचिन तेंडुलकर, कप्तान अझरुद्दीन, विनोद कांबळी, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि सरदार नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह हर्षा भोगले, रवी शास्त्री जुन्या खेळाडूं पैकी फारूक इंजिनियर, विश्वनाथ वगैरे यांची जवळीक साधता आली. अजित वाडेकर यांच्याशी एक वेगळेच नाते निर्माण झाले. तांबरम स्टेशनसाठी एक ट्रॉफी पण आम्हाला त्या वेळच्या मुख्यमंत्री जय ललिता यांच्या हस्ते देण्यात आली.
त्यावेळची आणखी आठवण म्हणजे माझ्या पुढाकाराने आधीच्या परिचयामुळे अजीत वाडेकरांनी स्टेट बँकेचे एजीएम म्हणून सूत्रे हातात घेतल्यावर आमच्या स्टेशनमधील बँकेची ब्रांच बंद करणाची रिझर्व बँकेची नोटीस त्यांनी रद्द केली.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800