“सुरेश वाडकर”
माझे बंधुतुल्य मित्र ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांचा जन्म दिवस नुकताच (७ ऑगस्ट रोजी) होऊन गेला आणि या निमित्ताने त्यांच्या काही आठवणी ताज्या झाल्या.
माझी व सुरेशची मैत्री १९७६ सालापासूनची आहे. याचे कारण म्हणजे सुरेश ची संगीत प्रभाकर ची परीक्षा परभणी येथील डॉ.गुलाम रसूल सर यांनी घेतली होती. दुसरे म्हणजे ज्येष्ठ संगीतकार जयदेव यांनी सुरेश ला गाण्याची संधी दिली होती. व त्यांनीच माझी पहिली ऑडिशन घेतली होती.
डॉ. गुलाम रसूल सर व सुरेश चे गुरुजी पंडित जियालाल वसंत हे चांगले मित्र होते. मला त्यांच्या गुरुजी मुळे अनेक कामे मिळाली होती.

सुरवातीस सुरेश वांद्रे येथे राहत होता. नंतर आमची ओळख मैत्री मध्ये रुपांतरित झाली. त्याच्या प्रेम दीदी, आई त्याचे कोल्हापूर चे भाऊ सर्व जण मला ओळखत होते.
एकदा मी त्याच्या आईला भेटण्यासाठी चिखली प्रयाग येथे गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला आग्रह करून जेवण दिले. त्या जेवण्याची चव अजूनही माझ्या लक्षात आहे. इतके चवदार जेवण मी कधीच केले नव्हते.
सुरेश सोबत मी अनेक गाणी कोरस मध्ये गायली आहेत. अनेक स्टेज शो मध्ये सहभागी झालो आहे. अनेक वर्षांपूर्वी थोर विभूती सत्य साईबाबा हे लातूर चाकुर नांदेड येथे आले असता मी तीन दिवस सुरेश सोबत होतो. त्या वेळी आमच्या सोबत स्वप्नील बांदोडकर, अविनाश आहेर प्रेमा दीदी होत्या. याच कार्यक्रमात मला थोर विभूती सत्य साईबाबा यांचा चरण स्पर्श झाला आहे.त्यांच्या सोबत कल्याणजी आनंदजी नाईट मुंबई माझी लाडकी परळी येथील महान विभूती श्री भगवान बाबा सप्ताह, नांदेड येथील प्रोग्रॅम, औरंगाबाद येथील प्रोग्रॅम, असे अनेक प्रोग्रॅम केले आहेत. सर्व प्रोग्रॅम आठवत नाहीत. त्यांनी गुरुजींचं स्वप्न गुरुकुल चे स्वप्न साकारले. त्यासाठी अथक परिश्रम केले.
अशा माझ्या ज्येष्ठ बंधुतुल्य मित्र पद्मश्री सुरेश वाडकर याला जन्म दिनाच्या निमित्ताने मन:पूर्वक सुरेल शुभेच्छा.
सुरेश तुम जियो हजारो साल साल मे मैफिल और रेकॉर्डिंग करो पचासहजार !

— लेखन : सिने गायक उदय वाईकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800