तुझ्या नि माझ्या छत्रीखाली तोही भिजून गेला
निथळत गेले थेंब थेंब अन् पाऊस पडून गेला..
जळजळत्या त्या निखाऱ्यासही जणू लाभते शांती
तो आला अन् मना मनाच्या जखमा शिवून गेला..
तोच स्वतःची माती होतो पण दुसऱ्याची काठी
हाक कुणाची आली म्हणता तेथे पळून गेला..
अंथरलेल्या अंधाराशी झुंजत जातो तोही
आभाळाचा चंद्र बिचारा कोठे लपून गेला..?
सुर्य उगवला, पहाट झाली निव्वळ प्रसन्नतेची
बिंब स्वतःचे पाहता दिपा तोही हसून गेला..
— रचना : सौ. दिपाली महेश वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800