Wednesday, December 3, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात सदरात आपले स्वागत आहे.
“देवश्रीच्या पत्रकारितेचा गौरव” या वृत्तांतास आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आपल्याही कुटुंबातील, परिचयातील कुणी असे यश मिळविले असल्यास त्याची माहिती व छायाचित्रे अवश्य पाठवावीत. असो.
आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

देवश्रीच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरवात दणक्यात झाली आहे. सामान्य जनतेच्या दैनंदिन समस्येवर सरकारला दखल घेण्यासाठीच्या लढ्यात तुझाही खारीचा नव्हे तर मी म्हणेन हा तर सिंहाचा वाटा असून अशीच अभिमानास्पद नोंद घेतली जाईल. अतिशय जुन्या आणि लोकप्रिय असलेल्या फ्री प्रेस जर्नल वृत्तपत्र समूहाचे प्रमुख श्री अभिषेक करनानी यांनी तुझ्या पत्रकार म्हणून सामान्य जनतेच्या लढ्यातील कामगिरीची जातीने दखल घेऊन तुझे मनापासुन अभिनंदन केले.
देवश्री, पुढील आयुष्यात एक नामांकित पत्रकार म्हणून गणना होईलच असा मला दांडगा विश्वास आहे.
आता मागे वळायचं तर नाहीच नाही पण थांबायचं सुद्धा नाही.
देवेन्द्रजी आणि अलका ताई या सारखे खंबीर आई वडीलांचे छत्र तुला लाभले आहे. ही तर तुझी गत जन्माची पुण्याइ आहे पुण्याई.
आणि सर्वात जास्त पुण्याई माझी आहे, कारण आज जे काही मी लिखाण करतोय ह्यासाठी मार्गदर्शन तू स्वतः तीन वर्षांपूर्वी न्यूज स्टोरी टुडे मध्ये केले होतेस.
— प्रकाश पळशीकर. पुणे

मा. देवश्री ताईंचे मनस्वी हार्दिक अभिनंदन ….
🙏🌹🙏🌹🙏
— अरुण पुराणिक. पुणे

देवश्रीच्या धडाडीच्या पत्रकारितेचे खूपच कौतुक. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला स्थगिती आणणे हे साधे काम नव्हेच. तिचे आणि पालक म्हणून आपणा दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
🌿🌹🌿.
— नीला बर्वे. सिंगापूर

सर, अन् मॅडम,
आपली सुकन्या देवश्रीचा यथोचित सन्मान झाला आहे त्यासाठी देवश्रीचे कौतुकासाह हार्दिक अभिनंदन. अन् पुढील कार्यप्रवासास अगणित शुभेच्छा 🌹
— सौ मीना घोडविंदे. ठाणे

हार्दिक अभिनंदन देवश्री. तुझ्या पत्रकारितेचा उपयोग समाज कार्यासाठी करून अशीच अनेक समाजोपयोगी कार्यात यशप्राप्ती करत राहा. त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
— मृदुला राजे. जमशेदपूर

देवश्री चे खुप खुप अभिनंदन. 💐👍 (भेटल्यावर नक्की माझ्याकडून बक्षिस !) डोळ्यासमोर छोटीशी देवश्री आहे. असेच सामाजिक प्रश्नांसाठी लढत रहा.
यशोमार्गाने पुढे जात रहाणार याचा विश्वास आहे.
All the best.
स्वागत चे काम खुप आत्मियतेचे असते.त्याने अंधांसाठी सातत्याने काम करण्याचा वसा घेतला आहे.
— शुभदा चिंधडे. ठाणे

डॉक्टर नव्हे देव ! सुंदर लेख. अशी देवमाणसं आहेत म्हणूनच जग चाललय. माणुसकी आहे अजून जिवंत. त्यांचा फोन नंबर, पत्ता कळवा सगळ्यांना. म्हणजे मदत करायला सोपे जाईल.
— नीता देशपांडे. पुणे

डॉ अभिजित हे स्वतः लिहितातही चांगले. माझा मुलगा त्यांच्यासाठी डोनर असल्याने त्यांचे अनुभव ते पाठवित असत. बरेचदा वाचले आहेत. अंगावर शहरे येतात, मन भारावून जाते, डोळे भरून येतात. अतिशय स्तुत्य कार्य करीत आहेत.
— स्वाती वर्तक. मुंबई

बेस्ट दिनाचे औचित्य साधून बेस्ट विषयी लिहिलेला सुंदर लेख💐👌👌🙏🙏
— अशोक जवकर.
सेवानिवृत्त उपमहाव्यवस्थक, बेस्ट, मुंबई.

राधिका भांडारकर यांच्या “माझी जडणघडण” भाग ६० वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया ……

खूप छान.
तुझी देना बॅन्क अगदी डोळ्यासमोर उभी राहिली.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव

खूपच प्रभावीपणे मांडलेली, मुद्देसूद रीतीची शब्दयोजना जाणवते या जडणघडणीतली.
— प्रज्ञा मिरासदार. पुणे

नोकरी करण्याची सुरुवात हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. एकदा सुरुवात केली की काही ना काही तरी मार्ग निघत राहतो. माझी वहिनी माझ्या च बरोबरीची, ती महाराष्ट्र बॅकेत तेव्हा च नोकरी ला लागली होती. त्याबाबतीत मला नेहमीच वाटतं की आपण माघार घेतली. मुले लहान, डॉक्टर नवरा, बाकी आधार काही नाही अशावेळी थोडं धाडस केलं असतं तर नोकरी नक्की करू शकले असते ! असो, हे सर्व आता होऊन गेले तरीपण तुझे अनुभव
वाचत असताना कुठेतरी हे जाणवून जाते आणि व्यक्त होते…🙏
— उज्वला सहस्त्रबुद्धे. दुबई

👌सुंदर
— अस्मिता पंडीत. पालघर

आणि मनाची घालमेल ती तर प्रत्येक स्रीची आहेच. माझी लेक दीप्ती, पंपाने breast milk बाटलीत काढून ऑफीसला जायची, किती ही पिळवणूक.
स्री जन्मा ही तुझी कहाणी
आचलमे दूध और आंखोमे पानी.
— छुंदा चाफेकर. मुंबई

छान अनुभव जीवनाचे..
— सुमती पवार. नाशिक

छान वाटते तुमची वाटचाल जाणून घेताना 🙏
— डॉ. शुभदा कुलकर्णी. जळगाव

शहरातील बॅकेत नोकरीतील अनुभव व गावातील बँकेत रुजू होतानां कसे सामावून घ्यावयाचे याचे सुरेख वर्णन केले आहे. हे करताना घरात लहानशा ज्योतीकाची असलेली काळजी, शेवटी एका कर्तव्यदक्ष स्त्री विषयीचे विचार खूपच प्रेरणादायी आहेत.
— श्रीकृष्ण भांडारकर. अमळनेर

खूप आवडलं.. खूप छान ऑब्झर्वेशन…
— सुचेता खेर. पुणे
१०
देना बॅंकेचा तुझा पहिला दिवस, छोट्या ज्योतिकाला विमलवर सोडून येताना मनातील तगमग, स्थानिक नव्या लोकांशी जुळवून कसे घेता येईल ही घालमेल आणि स्वतःचं प्रभावी व्यक्तिमत्व सांभाळण्याचा आत्मविश्वास या सर्व भावना तुझ्या या लेखात अगदी स्पष्ट उमटल्या आहेत. पुढील लेखात तुझ्या बॅंकेच्या या जीवनप्रवासाविषयी अधिक सविस्तर वाचावयास नक्की आवडेल.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
११
खूप छान शब्दांकन 👌👌
— अजित महाडकर. ठाणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. लग्न अगोदर केलेले नोकरी एकदम छान बिनधास्त असते पण लग्नानंतर मुलांकडे बघायला घरात मोठं कोणी नाही आणि सहा सात तास कामावर जायचं आहे आणि याची सुरुवात कशी होऊ शकेल हे तुमच्या लिखाणावरून एकदम पटलं आणि मनाची घालमेल अतिशय व्यवस्थित शब्दात मांडले आहे प्रत्येकाचा हा अनुभव निश्चितच असणार आहे पण तुमचे विचार निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहेत मी पण तुमच्यासोबत जवळपास 25 ते 30 वर्ष देना बँकेत नोकरी केली पण माझ्या घरी माझ्या सासूबाई सासरे होते त्यामुळे हा विचार माझ्या मनात कधी आला नव्हता आता त्यांची आठवण मला प्रकर्षाने जाणवते आहे त्यांच्या भरोशावर मी सहजपणे हे सगळं करू शकले तुम्ही आमच्या सहकारी आहात किंवा तुमच्याबरोबर आम्ही काम केलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे बऱ्याच गोष्टी तुम्ही नकळतपणे आम्हाला शिकवल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments