असे तसे दिस गेले
गेला श्रावण भिजून
तुझी वाट पाहताना
डोळे बसले रुसून.
आता पावसाची धून
येते आसमंतातून
मन हलके कोवळे
याद साठते आतून
सल पावसाळी कोठे
दाटे ह्रदयाच्या आत
भीजे पावसात कोणी
आत साठवून रात
असे अळवाचे पाणी
ओले रुपेरी नितळ
तसे तुझेही काळीज
भरे सुखाची ओंजळ

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
