हासत खेळत आनंदे डोलत
पाचूच्या रानात श्रावण आला
फांद्याफांद्यातून फुलून आला
मोत्यांच्या सरांनी भांग भरला
शिवामुठींनी शिव सजला
मंगळागौरींचा न्यारा सोहळा
गाज सागराची ऐकण्या आला
रक्षाया भगिनी बंधुही झाला
जन्माष्टमीच्या दहीकाल्याला
कृष्णासंगे गोफ गुंफण्या आला
इंद्रधनुचा बांधुनि झुला
पृथ्वीतलावरी स्वर्ग आणिला
निरोप देऊया श्रावणा आता
भादवा येतसे व्हा सिध्द स्वागता
गणेशाचे आगमन घरोघरी आता
आरास करुनी सिध्द पूजना आता

— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
