मोरया मोरया गजरी
श्रीबाप्पा विराजमान
आवाहन गणरायाचे
आनंदा आले उधाण
मिरवणूकी उत्साहात
मात्रराखे समाजभान
शास्त्रोक्त मंत्रोच्चारात
उजळे भक्तीचेलुभान
डि जे संयमी वाजला
राखे डेसिबल सन्मान
शाबीत राहतात कान
उंचावे सुखानंदे मान
पर्यावरण पूरक मूर्त्यां
होई निसर्गा अभिमान
आरासही देखणे छान
विषय सार्थ उर्जावान
रक्त दान अवयव दान
कुठेभुकेल्या अन्नदान
अभिनव उपक्रम रंगे
कार्यक्रम जोडे संधान
व्याख्यानमाला रंगल्या
कलाकारास्तव खदान
गणराज कलांचे दैवत
कित्येकां सुसंधीप्रदान
सर्व धर्मिय सम्मिलित
उत्सवाचे हेचं वरदान
गणेशावाटो परत येवू
तेंव्हांच खरे भाग्यवान
निरोप देता गजानना
राहू अधिक सावधान
अनुचित न घडो मुळी
आधी सतर्क प्रावधान
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800