पुण्याजवळील पुनावळे, भुजबळ वस्ती, माळवाडी येथील अनिका पिकॅडली या सोसायटीतल्या गणेश मंडळाच्या कार्यक्रमात नुकतेच बहारदार कविसंमेलन पार पडले.
अतिशय झपाट्याने विकसित होत असलेल्या पुनावळे भागात हल्ली आयटीयन्सचा जास्त भर दिसत आहे. यातील बऱ्याचशा रहिवाशी सोसायटींमध्ये गणेशोस्तवाचे छान नियोजन केले जाते.
अशीच एक सोसायटी म्हणजे अनिका पिकॅडली ही होय. येथील एक ज्येष्ठ कवी तथा निवृत्त बँक अधिकारी बाबू डिसोजा यांच्या पूढाकारातुन स्थानिक जेष्ठ कवी प्रा. तुकाराम पाटील, राज आहेरराव, विवेक कुलकर्णी आणि सविता इंगळे यांनी
तसेच स्वतः डिसोजा उर्फ कुमठेकर दाम्पत्यानेही उस्फुर्त सहभाग घेऊन एकाहुन एक सरस कविता सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
सौ.चंचल महाले, गौरी बिराजदार यांनी सुश्राव्य स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा तुकाराम पाटील होते. सूत्रसंचलन मा.विवेक कुलकर्णी यांनी रंगतदार केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.पाटील म्हणाले की, सोसायटीतील सहरहिवासी हीच आता आपली गावकी आणि भावकी माना आणि एकोपा असू द्या.
यावेळी सहभागी कविंना गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
अनिका पिकॅडली सोसायटीच्या रोहित महाले, नितीन तांबे, शुभम पोथाडे, संतोष वाघया कार्यकारिणी सदस्यांनी आणि गणेशोत्सव मंडळाच्या सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800