“शिट्टी”
मंडळी,
“शिट्टी” ही एक अत्यंत साध्या, पण बोलक्या चित्रातून प्रेरणा घेत केलेली कविता आहे. Minimalistic painting style अर्थात किमानतावादी चित्रशैलीतलं हे एक अनोळखी, पण अंतर्मुख करणाऱ्या आशयाचं चित्र. या शैलीत अत्यावश्यक तपशीलांनाच स्थान दिलं जातं, आणि त्यामुळे प्रत्येक रेषा, प्रत्येक जागा बोलकी होते.
या चित्रात एक मुलगी दिसते – पण ती जितकी दिसते, तितकीच ती दिसत नाही. तिचं शरीर अर्धवट, अपूर्ण आहे, आणि ती स्वतःलाच मिठीत घेत, एकप्रकारे स्वतःभोवती कवच तयार करत आहे. या गूढ मिठीतून तिचा स्वतःशी सुरू असलेला एक निरंतर लढा उलगडत जातो. चित्रात एक प्रकारची गूढ शांतता आहे – जी अचानक ऐकू आलेल्या ‘इंजिनाच्या शिट्टीसारखी’ आतून हलवून टाकणारी, अस्वस्थ करणारी आहे. तसंच या चित्रात कोणतीही पार्श्वभूमी नाही – फक्त काल्पनिक पात्र आणि त्याचं अधुरं अस्तित्व. ह्या अधुरेपणातच त्या भावना अधिक ठळकपणे उमटतात.
यावर्षी माझी मोठी मुलगी श्रिया कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. त्यासंदर्भात मनात आलेल्या भावनांना अनुषंगून ही कविता केली आहे, आणि म्हणूनच मला वाटतं की “शिट्टी” ही कविता या चित्रातल्या मौनाचा, एकाकीपणाचा आणि स्वतःच्या शोधाचा एक अधोरेखित आवाज आहे.
यूट्यूब चॅनलची लिंक खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800