गुलाबी मैना (Rosy Starling) या पक्षाचे नुकतेच जळगावी आगमन झाले. हा पक्षी नोन ब्रिडिंग सीझन मधील असल्याने त्यास गुलाबी रंग आलेला नाही, अशी माहिती पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

गुलाबी मैना हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो मध्य आणि पश्चिम आशिया तसेच पूर्व युरोपमधून हिवाळ्यात भारताच्या द्वीपकल्पीय भागात येतो. हे पक्षी समूहांमध्ये राहतात. ते भारतात ठिकठिकाणी आढळतात. विशेषतः पंजाब आणि महाराष्ट्र राज्यात यांचे मोठे थवे दिसून येतात. हे पक्षी जुलै-ऑगस्टमध्ये भारतात येतात आणि एप्रिलमध्ये परत जातात.

या पक्षाला ‘पळस मैना’ किंवा भोरडा, मधुसारिका असेही म्हणतात. संस्कृतमध्ये याला ‘पाटल सारिका’ असे म्हणतात.
जानेवारी–मार्च अखेरीस या पक्षाच्या डोक्याचा आणि मानेचा भाग काळा होतो, तर शरीर चमकदार गुलाबी रंगाचे होते आणि डोक्यावर आकर्षक तुरा दिसू लागतो, अशीही माहिती श्री गाडगीळ यांनी दिली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800