फक्त उध्वस्त करेफिरे
अतिरेकी आक्रस्ताळ
कठिण बंदिस्त करणे
धारतारौद्ररूप वेताळ
ज्वालामुखी जनक्षोभ
भक्ष्यस्थानी हा नेपाळ
अस्वस्थ झाले जीवन
सामान्यजन अंसुढाळ
माता भगिनी छत्रहीन
निर्लज्जहिंडे लांफाळ
आगंतुक वितुष्ट शक्ती
दुष्कृत्यकरे खोडसाळ
कोण करे स्नेहशिंपण
पडे मानवता दुष्काळ
स्वाहा करी निसर्गाला
कुरूप विद्रुप विक्राळ
भयावह परिस्थितीची
अस्वस्थता त्रितिकाळ
आटोक्या येणार कधी
कसा नग्नभैरव वेताळ
अजून किती घेई बळी
भाग्य बडवते कपाळ
थांबवा आता उफाळ
धावधाव बा प्रतिपाळ
विनंती करे सदाशिवा
पशुपति नाथा कृपाळ
संकटी शांत देव भूमी
सांभाळ सांभाळ नेपाळ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800