Friday, November 14, 2025
Homeबातम्यानागपूर : सेवा संस्थांच्या प्रदर्शनाला छान प्रतिसाद

नागपूर : सेवा संस्थांच्या प्रदर्शनाला छान प्रतिसाद

स्वयंसेवी सेवा संस्थांचे कार्य समाजासमोर आणण्यात “ग्रामायण” महत्त्वाची भूमिका बजावित आहे. याचाच एक भाग म्हणून “ग्रामायण” गत वर्षापासून नागपूर येथे अभ्युदय सेवा प्रदर्शन भरवीत आहे. या वर्षी हे प्रदर्शन फ्रेंडस को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या तात्या टोपे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध भागातील ५८ स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या असून प्रदर्शनाला छान प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन उद्या रविवार पर्यंत असून सर्व नागरिकांसाठी खुले असून प्रवेश मोफत आहे.

उद्घाटन सोहळा :
प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना गुंतवणूक जाणकार श्री शशिकांत चौधरी यांनी सर्व सेवाभावी संस्थांनी अनुभवाची देवाणघेवाण करून आपले कार्य अधिक प्रभावी करण्याची सूचना केली. तसेच मुंबईस्थित केअरिंग फ्रेंडस च्या धर्तीवर ग्रामायणने कार्य करावे, असा मोलाचा सल्ला दिला.

प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक आणि विश्व हिंदू परिषद, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष श्री नंदकिशोर दंढारे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व यवतमाळ अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंकेचे अध्यक्ष नितीन खर्चे आणि फ्रेंडस को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष श्री सुभाष मंडलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

श्री विश्वास देशपांडे यांनी स्वागत गीत सादर केले.
श्री सुभाष मंडलेकर यांनी आमंत्रितांचे स्वागत करून प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.
श्री नितीन खर्चे यांनी ग्रामायणने सेवा संस्थांना उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, अतिथी परिचय आणि सूत्र संचालन सौ मंजुषा रागीट यांनी केले. आभार प्रदर्शन श्री संजयजी सराफ यांनी केले.

‌ग्रामायणचे अध्यक्ष श्री अनिल सांबरे, उपाध्यक्ष डॉ चंद्रकांत रागीट, सचिव श्री संजय सराफ, एनजीओ मार्गदर्शक श्री विजय खटी आणि श्री अनिरुद्ध केळकर विशेषत्वाने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on “वाढत्या आत्महत्या : या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”
सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !