“असेही होऊ शकते !” या स्वानुभवावर आधारित लेखावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातील काहींनी मोबाईल वापरताना काय दक्षता घेतली पाहिजे ? अशी विचारणा केली आहे. या अनुषंगाने या पूर्वी आपल्या पोर्टल वर काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. आता या लेखाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या सूचना पुढे देत आहे. सर्व वाचकांनी आपण रहात असलेल्या भागातील पोलिस ठाणे, तेथील पोलीस अधिकारी, आपल्या भागाशी संबंधित पोलिसांच्या सायबर कक्षाचे संपर्क क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये अवश्य असू द्या.
— संपादक
व्हिडीओ कॉल ? की सेक्सटॉर्शनचा सापळा ? ⚠️
🔹 अनोळखी व्हिडीओ कॉल उचलल्यानंतर सुरू होतो ब्लॅकमेलचा खेळ! ते कॉल अश्लील असल्याचं दाखवून तुमचा स्क्रीन रेकॉर्ड केला जातो आणि मग त्याचा गैरवापर करून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न होतो.
“तुमचे फोटो व्हायरल करू” अशी धमकी देत तुमच्या संपर्कातील लोकांना पाठवण्याची भीती दाखवली जाते.

🛡️ सेक्सटॉर्शनपासून वाचण्यासाठी :
✅ अनोळखी व्हिडीओ कॉल्स उचलू नका.
✅ कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची खात्री करा.
✅ मोबाइल, लॅपटॉपच्या कॅमेऱ्यांना परवानग्या देताना सावधगिरी बाळगा.
✅ अशा कोणत्याही प्रकारचा कॉल आल्यास किंवा फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.
🚨 सेक्सटॉर्शन टाळण्यासाठी जागरूक राहा !
🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सेवेस तत्पर !
नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800