मी म्हणजे तो विचार माझा,
मी म्हणजे माझे ते जगणे,
मी म्हणजे तो निर्णय माझा,
मी म्हणजे, हरणे अन् जिंकणे,
मी म्हणजे माझी ती स्वप्ने,
मी म्हणजे तो सुप्त आधार,
मी म्हणजे अहंकार नि प्रतिमा,
मी म्हणजे सहा रिपूंचा व्यवहार,
मी म्हणजे संस्कार तो माझा,
मी म्हणजे माझ्यामुळे सृजन,
मी म्हणजे नृत्य, नाटक, वादन,
मी म्हणजे नात्यांचे रेशमी बंधन,
मी म्हणजे हृदयातील प्रेमभाव,
मी म्हणजे कणव, काळजी, कीव,
मी म्हणजे जगण्याचे ते सप्तरंग,
मी म्हणजे वेणु, मोरपिस, श्रीरंग…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ..
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800