Monday, September 15, 2025
Homeबातम्याविराग मधुमालती : नवा विक्रम

विराग मधुमालती : नवा विक्रम

“शिवतांडव स्तोत्रम्” सर्वाधिक जलदगतीने गाऊन विक्रमवीर विराग मधुमालती यांनी नवा विक्रम नोंदवला.

लोणावळ्याजवळ असलेल्या कॅनरी आयलंडमध्ये विराग मधुमालती यांनी शिवभक्तीचे शिखर स्तोत्र ‘शिवतांडव स्तोत्रम्’ चे संपूर्ण गायन केवळ १ मिनिट ३३ सेकंदात पूर्ण करून हा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, इतक्या जलदगतीतही त्यांनी मंत्रांचे उच्चार अत्यंत स्पष्ट, सुर, ताल व लय यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले, जे त्यांच्या वर्षानुवर्षांच्या कठोर साधनेचे उदाहरण आहे.

या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेतही विराग मधुमालती यांनी ‘शिवतांडव स्तोत्रम्’ गाऊन उपस्थित पत्रकारांना मंत्रमुग्ध केले.

पुढील व्हिडिओत आपण शिवस्त्रोतम चे प्रात्यक्षिक अनुभवू शकता….

यावेळी विराग मधुमालती यांच्या विविध उपक्रमांची चित्रफित दाखविण्यात आली. यातील चित्रीकरण भारतातील विविध ठिकाणी करण्यात आले असून ते त्यांच्या ‘Virag Madhumalati Music’ या यू ट्यूब वाहिनीवर प्रकाशित केले आहे.

विराग मधुमालती अनेक वर्षांपासून शिवसाधनेत लीन असून मागील चार वर्षांपासून त्यांनी शिवतांडव स्तोत्रम् वर विशेष संशोधन व अभ्यास केला.

या पत्रकार परिषदेस विराग मधुमालती यांच्या सहचारिणी सौ वंदना वानखडे, कॅनरी आयलंडचे संस्थापक श्री. नंदकुमार वाळंज व संचालक श्री. सागर वाळंज उपस्थित होते.

पूर्वीचे विक्रम :
विराग मधुमालती यांनी या आधीही ७ जागतिक विक्रम प्रस्थापित करून भारताचा गौरव वाढवला आहे. तसेच अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती केली आहे.

त्यांच्या काही उल्लेखनीय कामगिरी म्हणजे, नेत्रदान जनजागृतीसाठी सलग १०० दिवस डोळ्यांवर काळी पट्टी बांधून ते दृष्टिहीन व्यक्तीप्रमाणे जीवन जगले. जागोजागी कार्यक्रम घेऊन त्यांनी नेत्रदानाचे महत्व लोकांना पटवून दिले.

सप्टेंबर २०२४ मध्ये नवी मुंबई ते राजस्थानातील नाकोडाजी या १३०५ किमी अंतराची पदयात्रा साधारण १०० दिवसांत पूर्ण करण्याबरोबरच त्यांनी ५४ हजार रोपे लावली. ठिकठिकाणी पर्यावरण जनजागृतीही केली.
ह्याच यात्रेत सलग २४ तासांत १११ किमी चालत आणखी एक जागतिक विक्रम नोंदवला.

विराग मधुमालती यांची ही अभूतपूर्व कामगिरी केवळ भारतीय संस्कृती आणि भक्तीपरंपरेला जागतिक स्तरावर गौरव मिळवून देणारी नसून समर्पण, अनुशासन व सकारात्मकतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments