Tuesday, September 16, 2025
Homeयशकथाझेप : ३

झेप : ३

बाल क्रिकेटपटू “काव्या”

क्रिकेटपटू काव्या कांचन देवेंद्र गडकरी, वय वर्ष केवळ ११ ! तिला जेंव्हा मी प्रत्यक्ष पाहिलं तेंव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आणि बसणार तरी कसा ? कारण तिचे वय आणि शरीरयष्टी. अंगाने सडपातळ असलेली काव्या ही जलदगती गोलंदाज असेल हे खरंच वाटेना. परंतु जेंव्हा कळलं ती, ‘आयटिज दि. बा. पाटिल स्कूल’ – पनवेल शाळेच्या क्रिकेट संघाची कप्तान आहे, तिचे काही व्हिडिओज पाहिले अन् खात्रीच झाली हो, निश्चितच ती जलदगती गोलंदाज आहे.

वयाच्या आठव्या वर्षापासून काव्याने क्रिकेट खेळायला सुरवात केली. एवढ्या बालवयात खरं तर मुलींचे खेळ वेगळे असतात अन् त्यातच त्या रमतात. परंतु काव्याने ठरवलं की मी क्रिकेट या खेळातच भाग घेणार. तिची आवड ओळखून दोन वर्षानंतर तिला आईवडिलांनी सोसायटी क्रिकेट क्लब, पनवेल येथे दाखल केले. तिथे तिचा सराव सुरू झाला. ती भरपूर मेहनत घ्यायला लागली. साहजिकच तिची वेगाने प्रगती व्हायला लागली.

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत तिचा संघ अंतीम फेरीपर्यंत पोचला. हा अंतिम सामना पहायला “दि राईट पिच” या संस्थेचे कोच उपस्थित होते. काव्याचे कप्तानपद व तिची जलदगती गोलंदाजी, इतक्या लहान वयातील तिचे नेतृत्वगुण त्यांनी हेरले अन् तिचे भरभरून कौतुक तर केलेच पण तिची निवडही केली. PACE LAB – ENGLAND या संस्थेचे मुंबईतील पदाधिकारी सुद्धा हा सामना पहायला आले होते. त्यांनी तर तिला त्यांच्या संस्थेची फेलोशिप दिली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या संस्थेने पाच दिवसांच्या प्रशिक्षण स्पर्धेसाठी निमंत्रित करून तिला ११ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालधीत तिला खास प्रशिक्षण दिले आहे.

काव्याचा भाऊ हर्षल हा आयटिज शाळेत गेली पंचवीस वर्ष क्रिकेटचा कोच आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट टीम सराव करत असते. क्रिकेट क्षेत्रात खेळाडूंनी भरारी मारावी यासाठी तो सतत कार्यरत असतो. काव्याच्या पावलांवर पावले टाकत याच शाळेचे काही खेळाडू प्रगतीच्या टप्यावर आहेत, हे ही एक विशेषच !

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात हे तुला कधीच जमणार नाही. परंतु, काव्याने हे सिद्ध करायला सुरवात केली आहे. आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरवात करून या तीन वर्षातच तिला काही पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यातील काही महत्वाचे असे……………
१) The Right Pitch Premier League – Mumbai चा women of the Series Trophy for the Best Boller.
२) UBS Atheletics kids Cup 2025 The Raigad District Regional Female GOLD MEDAL.
३) । Tech oddsye 2024 – 2025 Cricket Premium League – Team Captain 2nd Price.

या व्यतिरिक्त STEFFN JONES (England Fast Boller) PACELAB Achademy या संस्थेची तिला स्कॉलरशिप मिळाली आहे.

काव्याची गोलंदाजी कुणासारखी वाटते ? असा प्रश्न विचारल्यावर काही क्रिकेटपटू म्हणतात की, ‘आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मार्केलनयाच्याशी तिच्या गोलंदाजीचे साम्य आढळते.

तुझं स्वप्नं काय आहे ? भविष्यात तुला काय व्हावसं वाटतं ? असे विचारल्यावर क्षणातच काव्या म्हणाली,
‘भारताच्या महिला क्रिकेट टीममधे खेळण्याचे व कप्तान होण्याचं माझं स्वप्नं आहे’ हे स्वप्नं उराशी बाळगून काव्याचा खेळ अधिकाधिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे. ‘आकांक्षा पुढती गगनही ठेंगणे’ असं निश्चित म्हणू शकतो.

‘सातत्य हेच स्वप्नांना वास्तवात आणते. सातत्यपूर्ण मेहनत हेच खऱ्या यशाचे रहस्य आहे’ काव्याने ते ओळखले आहे व सातत्य राखूनच तिचा सराव सुरू आहे.

क्रिकेट हा खेळ श्रीमंतांचा आहे असा एक समज आहे परंतु, काव्या सर्वसाधारण कुटुंबातली असूनही तिला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी प्रयत्नशील असते व तिच्या सर्व कुटुंबाचा पाठिंबा सहकार्य वेळोवेळी तिला मिळत असतो हे खरंच कौतुकास्पद आहे.

काव्या क्रिकेट क्षेत्रात जशी कामगिरी करत आहे तशीच भरारी शिक्षण क्षेत्रातही मारत आहे, तिला ९० टक्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळतात, अभ्यास क्षेत्रातील गोलंदाजीमधे ती प्राविण्य मिळवते हे मुद्दाम नमुद करावेसे वाटते.

काव्याची क्रिकेट क्षेत्रातील मेहनत, जिद्द, परिश्रम, सातत्य, तिचं उत्तुंग स्वप्नं याची दखल रुक्मिणी पांडुरंग चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या संस्थेने घेऊन काव्याला २०२५ सालचा दि म्हसळा टाइम्स “क्रिडारत्न” पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे, ही विशेष कौतुकाची बाब आहे.

भावी काळात काव्या ही भारतीय महिला क्रिकेट संघातर्फे खेळताना आपल्याला नक्की दिसेल असा मला विश्वास आहे.
न्युज स्टोरी टुडे पोर्टलच्या परिवारातर्फे काव्याला खूप खूप शुभेच्छा.

सुनील चिटणीस

— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. उभरत्या कळीच्या यशाचा उत्तम वेध सुनीलजी.. सुंदर.. आणि काव्या ला अनेकानेक आशीर्वाद..

  2. एवढ्या लहान वयात एवढी मोठी झेप आणि एवढे पुरस्कार खूप खूप कौतुक आहे. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खुपसाऱ्या शुभेच्छा 👍

  3. इतक्या लहान वयात इतकी उत्तुंग कामगिरी करणं खूप कौतुकास्पद आहे. सुनीलजी खूप छान परिचय करून दिलात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं