पृथ्वीचे वातावरण संतुलित राहण्यासाठी ओझोन ची फार महत्त्वाची भूमिका असते. याकडे लक्ष वेधण्यासाठी दर वर्षी १६ सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन संवर्धन दिन साजरा करण्यात येत असतो.
त्यानिमित्ताने सादर करीत आहे ही कविता.
— संपादक
आहे सोळा सप्टेंबर
विश्व ओझोन तो दिन
ओझोन पृथ्वी रक्षिता
करु तयाचे जतन
अतीनील किरण ते
सूर्यदेवाचे दाहक
कमी करी दाहकता
ठरे ओझोन तारक
प्राण वायुंचे संयुग
पृथ्वीसाठी हे मोलाचे
सम थर्माकोल चीजा
थर विरळक त्याचे
टाळू वापर अशांचा
विरळती ओझोनला
वायू घातक आवरा
वाचवू हो या सृष्टीला
रक्षा ओझोन करता
भावी पिढ्यांचे जगणे
येथे टिके सृष्टी जीव
त्याचसाठी हे सांगणे
— रचना : सुधीर शेरे. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800