नवी मुंबईतील नवरंग साहित्य संस्कृती कला मंडळ आणि भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करावे गावातील ज्ञानदीप हायस्कूलमध्ये “भारतीय सण उत्सव” या विषयावर नुकतेच आयोजित करण्यात आलेले कवी संमेलन चांगलेच रंगले.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिका पाकिजा आत्तार म्हणाल्या, “भारतीय सणांमुळे वर्षभर आनंद व्यक्त करता येतो.”

या कवी संमेलनात मुंबई, पनवेल, मुंबई, उल्हासनगर या भागातील कवींनी आपल्या कविता सादर केल्या. ज्येष्ठ कवी खंडू अडागळे, मिलिंद कल्याणकर, गज आनन म्हात्रे, पाकिजा आत्तार, रूपाली शिंगे तसेच अश्विनी म्हात्रे, सुभाष कोडोलकर, सुचित्रा कुंचुमवार यांनी आपल्या कविता सादर केल्या.
संस्थेचे अध्यक्ष ‘गज आनन म्हात्रे’ यांनी सूत्रसंचालन केले. सुचित्रा कुंचुमवार यांनी आभार प्रदर्शन केले. ज्ञानदीप हायस्कूलचे रत्नाकर तांडेल सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800