Wednesday, December 3, 2025
Homeबातम्याअसे रंगले "विविधा" संमेलन

असे रंगले “विविधा” संमेलन

अहमदाबाद इथे ‘विविधा’ हे पहिले कविसंमेलन नुकतेच अतिशय छान झाले. त्याचा हा वृत्तांत….
— संपादक

सर्वांच्या छायाचित्रांसहीत “काव्यसंपदा” चे बॅनर, फुलांची आकर्षक सजावट, सरस्वती पूजन यामुळे पहिल्यावहिल्या “विविधा” काव्य संमेलनाचे वातावरण आनंदमय झाले होते.

रसिक श्रोत्या सख्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सर्वांनी एकत्रच सरस्वती वंदना गायली.

संमेलनाला प्रारंभ झाला प्रिती जांभेकर यांच्या स्वरचित गणेश प्रार्थनेने. जयश्री भावे, वैशाली वर्तक, सुषमा चौसाळकर, संध्या देव, मंजूषा आपटे, अंजली केळकर, सुष्मिता शिंदे, अनुपमा जोशीराव, सुषमा दळवी, सुनीता जोशी, वैशाली करंदीकर आदी उत्स्फूर्त कविता सादर केल्या.

संमेलनाच्या आयोजक आणि निवेदिका स्मिता कोरडे आणि अनला बापट यांनीही आपापल्या सुंदर कविता सादर केल्या. तर रेखा दामले, स्वाती जोशी, पद्मा कुलकर्णी, वर्षा बडवे, प्राजक्ता पालोरकर यांनी इतर कवींनी लिहिलेल्या आणि त्यांना आवडलेल्या कविता सादर केल्या.

यानंतर एक सुखद आश्चर्य सर्वांसाठी तयार होतं. बक्षिस म्हणून सर्व सहभागी कवींना सुरेख प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. अनलाच्या या अभिनव कल्पनेचं सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं. सर्वांना काव्य सादरीकरणासाठी प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले, तेही रसिक प्रेक्षक श्रोत्यांमधून प्रत्येक सखीच्या हस्ते.

स्मिता, अनला अतिशय हसत खेळत अगदी अनोख्याच पद्धतीने सूत्र संचालन केले. वर्षा बडवे यांनी आभार प्रदर्शन केले. नंतर पोहे आणि मसाला दुधाचा सर्वांनी आनंद घेतला.

सुषमा दळवींच्या संकल्पनेतून आणि मंजूषा आपटे च्या अध्यक्षतेखाली स्मिता कोरडे आणि अनला बापट यांनी केलेले हे काव्यसंमेलन अविस्मरणीय असेच झाले. पुन्हा असे संमेलन नक्की करू या, ह्या निश्चयाने सगळ्या जणी गोड आठवणी घेऊन घरी गेले.

— लेखन : स्मिता शेखर कोरडे.
— संकलन : सौ. अनला बापट
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments