Monday, December 22, 2025
Homeसाहित्यदिवाळी : काही रचना

दिवाळी : काही रचना

१. दिवाळी

सोनेरी पहाट अन रमणीय क्षण
मंगलमय असा दिवाळीचा सण
रांगोळ्यांनी रेखीले माझे अंगण
दार ल्याले सुगंधी सुमनांचे तोरण 🪔

तडतड फुलबाजी आकाशी बाण
नेत्र जरी सुखावले दडले मात्र कान
भुइ चक्रांची किती मोहक गिरकी
अनार, नागगोळी सार्यांचीच शान 🪔

फराळाचा घमघमाट जिव्हा सुखावली
पिवळ्या शेवेसह गोलगोल चकली
लाडु वरती बेदाणा बसला शोभीवंत
पिस्ता काजु चारोळी करंजी सारणात 🪔

रवा बेसन मोतिचुर नानाविध लाडू
खुमासदार चिवड्याशी चहाघोट घेऊ
शंकरपाळी नानकटाई गोड गोड खाऊ
या या फराळाला मिळूनी समाचार घेऊ 🪔

नवीनकोरे कपडे बालगोपालांच्या अंगी
घागरा चोळी शालुत ललना पहा रंगी
दादा भाऊ तात्यांचे झब्बे शानदार
दिवाळी साजरी करण्या सारे तय्यार 🪔

आता विसरा ना सारे तुम्ही हेवेदावे
प्रेमभरे निर्मळ मनाने आलिंगन द्यावे
घेऊन येते दिपावली मोदभरे क्षण
जीवनी चैतन्याची करुया साठवण 🪔

— रचना : नेहा हजारे. ठाणे

२. पाडवा ..

पती पत्नी नाते शालू
माणीकप्रेमाचे जडवा
वाटून घ्यावे सुखदुःख
तोच  खरोखर पाडवा

चुकला पदार्थ जरीही
तरीही करावी वाहवा
चव घेता कळे  तिला
करेल   तुमची  परवा

मुद्दाम  कधी  कधी रे
स्वत:  स्वतास  हरवा
हरण्यात  प्रिये कडूनि
असतो  अद्भुत गारवा

दरवेळी जाळ्या मध्ये
फसतो  कसा  गाढवा
गाढव  होण्या मध्येही
असतो अवीट गोडवा

तीच्याआधी जेवतायं
कधी  तिलाही  भरवा
आनंदाच्या  अंगणात
घुमु लागेल  रे  पारवा

सुवर्ण क्षण मिळतील
ढुंढाळत राहता नेरवा
जुळून ये जीवन गाणे
छेडत  असता  मारवा

बोला  निर्णय तुझा गं
रे भले  तुम्हीचं  ठरवा
चुकता  कुठे  काहीही
सुई  स्वताकडे फिरवा

— रचना : हेमंत मुसरीफ.
निवृत्त उप महाप्रबंधक, बॅंक ऑफ महाराष्ट्र ,पुणे .

३. संसार रथ…

भारतीय संस्कृतीत पती-पत्नीचे नाते पवित्र
संसारी एकरूपतेचे प्रतिक मानले जात IIधृII

स्नेह प्रेम परस्परांप्रती असावे नात्यांत
आदर विश्वास टिकण्यासाठी जीव टाकणं
सहजीवनी प्रेम बंधनात व्हावे रमण II1II

एकमेकांसाठी माघार घ्यावी समजूतीनं
सहवासात राहूनही जपणे स्वतंत्रपण
बहरण्याची मुभा देण्याचे असावे वागणं II2II

असावा सुसंवाद दैनंदिन व्यवहारांत
पूरक बदल घडती पती-पत्नीच्या नात्यांत
नाते सकस समृद्ध होते प्रगल्भ अर्थपूर्ण II3II

पती-पत्नी संसार रथाची चाके होत दोन
विवाह संस्था भारतीय संस्कृतीत अनन्य
कुटुंब स्वास्थ्य राहते अमर नाते आश्वस्त II4II

सहवास सहकार्य सामंजस्य समायोजन
काळासम जरूर गरजांना द्यावा प्रतिसाद
पाडवा नित्य फुलेल सकारात्मक साथीनं II5II

— रचना : अरुण गांगल. कर्जत – रायगड

– संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”
सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37