नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात दिवाळी होती. त्यामुळे कदाचित वाचकांना पोर्टल वाचायला वेळ मिळाला नसेल आणि ज्यांना वेळ मिळाला असेल, त्यातील बहुतेकांना प्रतिक्रिया लिहिण्यासाठी वेळ मिळाला नसेल. आणि ते साहजिकही आहे. असे असले तरी थोड्या का होईना, काही वाचकांनी मात्र आपापल्या प्रतिक्रिया पाठविल्या आहेत. त्या पुढे देत आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे रविवारी मला लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते माध्यमभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाची बातमी काल पोर्टलवर प्रसिद्ध केल्यापासून खूप शुभेच्छा प्राप्त झाल्या आणि होत आहेत. हा पुरस्कार मला एकट्याला मिळाला नसून तो न्यूज स्टोरी टुडे ची टीम आणि आपणा सर्वांना मिळाला आहे,असे मला वाटते. शुभेच्छा देणाऱ्या सर्व सुहृदांचे मनःपूर्वक आभार. आपला लोभ असाच कायम असू द्या.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
भूदान चळवळीबद्दल वाचून भारावल्यासारखे झाले. पूर्वीचे नेता, पुढारी संत शोभतील असे शांत, संयत प्रामाणिक होते. निधीसुद्धा न घेणारे विनोबा बघून आपोआप नतमस्तक होतो आपण. धन्यवाद मोनेजी.
अनुराधाताईंची कातरवेळ ही कथा नव्हे.. तरल काव्यच आहे ..सुरेख अलवार…
स्नेहाजींची रेसिपी गोड, बहारदार.
कासार आणि गांगलजींच्या कविता उत्तम.
— स्वाती वर्तक. मुंबई
२
कुष्ठरोग : दृष्टिकोन बदलणे गरजेचे …
या वृत्तांताविषयी प्राप्त झालेली प्रतिक्रिया ..
१९८०/८५ च्या दरम्यान आईएएस इंग्लिश मीडियम स्कूल दादर (किंग जॉर्ज आधीचे) या शाळेत असताना आम्ही शाळेतील नववीच्या मुलांचे तीन दिवसीय शिबिर नेरे येथे घेतले होते. (senior n incharge) त्यावेळी मुलांसमवेत आम्ही पुष्कळ उपक्रम राबवले होते. जसे मळ्यात काम करणे, रस्ते तयार करणे, झाडलोट करणे, किचन मधली कामे मुलामुलींनी वाटून घेऊन करणे, संध्याकाळी बरे झालेल्या कुष्ठरोग्याचे आणि इतरांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रम करणे, गप्पाटप्पा करणे, इत्यादी. येथील डॉक्टर या रोगाविषयी सविस्तर माहिती देत आणि काही फिल्म्स देखील दाखवत. तीन दिवसात मुलांना तेथील दादा, ताईंनी (कर्मचारी वर्ग व मार्गदर्शक) खूप लळा लावला. आमचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. परत येताना मुलं अक्षरश: रडत होती. तर आई दादा गहिवरून जात असत.
मुले, टीचर अजून एक दोन दिवस मुक्काम वाढवा असे म्हणत मागे लागली होती.
कोणालाच येथील कोणत्याही वातावरणाची घृणा आली नाही. तेव्हा माननीय प्रकाश मोहाडीकर सर यांचा जवळून परिचय झाला. तेही तेथे उपस्थित होते. येथील मुक्काम व कार्य सर्वांसाठी स्मरणीय होते.
— जयश्री चौधरी. मुंबई
३
अलकाताई मोहोळकर खूप छान लिहितात. त्या माझी मैत्रीणच आहेत आमच्या भजनामध्ये त्या आहेत कालिका देवी भजनी मंडळ आमचं पंढरपुरात खूप छान आहे . त्या भजनी मंडळाच्या त प्रमुख आहेत. त्यांच्या कथा नेहमीच प्रसिद्ध करत जावा खूप छान आहेत. धन्यवाद🙏
— जयश्री कुलकर्णी. पंढरपूर
४
सर नमस्कार,
दीपक ठाकूर यांचे ‘अनोखे रमेशकाका’ मनाला खूप भावले.
सर, “बुम ला पास” चे खूप सुंदर वर्णन. इतके अप्रतिम निसर्गसौंदर्य, असलेले ऐतिहासिक महत्त्व आणि एवढ्या दुर्गम भागात चोवीस तास डोळ्यांत तेल घालून देशाचे रक्षण करत असलेले आपले सैनिक सारे काही डोळ्यांसमोर उभे राहिले. सुंदर लेख.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
५
हास्य, अभिनय आणि सहजतेचा अप्रतिम मिश्रण असलेले दिग्गज अभिनेते असरानी जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. शोले, चुपके चुपके, अभिमान,तसेच 80 च्या दशकात जितेंद्र श्रीदेवी या जोडीच्या अनेक सुपरहिट फिल्म्स मध्ये असरानी ची विशेष विनोदी भूमिका असायची. चला मुरारी हिरो बनने यात असरानी ने हिरो चे पण काम केले यात असरानी वर चित्रित किशोर कुमार ने गायलेले ना जाणे दिन कैसे जीवन मे आये विशेष गाजले, ‘तेरी मेहेरबानीया त खलनायकी पण केली. आपल्या विनोदबुद्धीने, संवादातील नेमकेपणाने आणि प्रसंगाला साजेशा टायमिंगने त्यांनी रसिकांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य फुलवलं. अनेक चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्राने कायमच आपल्या मनात घर केलं. अशा हरहुन्नरी आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐🙏🏻
— संदीप भुजबळ. संगमनेर
राधिका भांडारकर यांच्या “माझी जडणघडण” भाग ६९ वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया ….
१
टॅली खुप सुंदर.
— संध्या जंगले. मुंबई
२
फार सुंदर. न विसरता येणारा व पुन्हा कधीच परत न येणारा श्रावण धुसर झालेला…
— प्रा. सुमती पवार. नाशिक
३
खरंच तुझ्या अवती भोवतीच्या माणसांना तू छान टिपतेस आणि लक्षातही ठेवतेस. तुझ्यातली लेखिका सदैव तत्पर असते आणि ते प्रसंग छोटे का असेना पण तू त्यातले मोठेपण छान Highlight करतेस. ही तुझी शैली आहे. प्रत्येक प्रसंग वाचताना काटा येतो.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
४
👌सुंदर
— अस्मिता पंडीत. पालघर
५
तुझ्या जीवनातील अनुभव अगदी यथार्थ शब्दात तू वाचकांसमोर ठेवले आहेस.
खूप छान!
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
६
राधिका… खूप छान लिहिलं आहेस…माझ्या सुद्धा एलआयसी मधील इतक्या आठवणी आहेत!!! कितीतरी माणसं अजूनही डोळ्यासमोर येतात.. किती तरी आयुष्याच्या या टप्प्यावर उलगडलेली नाहीत आणि काही जी समजली असं वाटलं ती पण वेगळीच निघाली !!! पण एकंदर अनुभवाचा खूप मोठं गाठोडं आपल्या नोकरीत आपल्याला आयुष्याच्या स्थैर्याबरोबरच गोळा करता आलं. माझे सुद्धा ते दिवस खूप छान होते.. हे सर्व वाचताना सुद्धा मी पण माझ्या त्या जुन्या दिवसात हरवून गेले.. आता ते जग मागे पडले आहे ..पण अजूनही 30-35 मैत्रिणींच्या संपर्कात मी आहे.. अजूनही आम्ही खूप गप्पा मारतो!! त्यातल्या कित्येक जणी माझ्यापेक्षा लहानपण आहेत आणि किती जणी आता 80 च्या पुढच्याही आहेत.. पण प्रत्येकीच्या बरोबरचे स्नेहसंबंधाचे पदर वेगळे….
— सुचेता खेर. पुणे
७
खूप छान लिहिलं आहे. त्या त्या व्यक्ती डोळयांसमोर उभ्या राहतात.
👍👍👍
— अजित महाडकर. ठाणे
८
इतकी सहज टिपतेस सगळ्यांना ,अगदी लहानपणी प्राजक्ताची फुलं फ्राॅकच्या घेरात टिपावीत तशी.एकेक फूल पडून जाऊ नये म्हणून जपतेसही तशीच ! तुझ्या भरलेल्या ओंजळीतून अशीच कथासुमनं बाहेर पडून रसिकांच्या मनाचा ठाव घेवोत.
सगळ्यांच्याच आयुष्यात माणसं येतात आणि जातात पण सामान्यांमधल्या असामान्यत्वाची दखल घेऊन तुझी लेखणी वाचकांच्या मनात स्थान देते.
— साधना नाचणे. ठाणे
९
ताई,
सर्व प्रथम तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळी आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
टॅली हा लेख तुमच्या करिअर दरम्यानच्या जळगावच्या ऑफिस-बॅंक मधला लेखाजोखा आहे, जो खूप सुंदर आहे. सुंदर वर्णन केले आहे. अनेकविध पैलू असणारे सह कर्मचारींचे वर्णन छानच..
एक कटिंग चहा आणि श्रींची इच्छा छान खुलवली नवीन भागाच्या प्रतिक्षेत.
— मानसी म्हसकर. वडोदरा
१०
खूप छान टॅली ! डोळ्यासमोर प्रत्येक पात्र उभे राहिले. सामान्यामध्ये असामान्यनत्व शोधण्याची वृती फार आवडली. अशीच लिहीत राहा.
— रेखा राव. मुंबई.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
