ध्यास घेउनी खेळ खेळणे,
आपल्यातील उत्तम ते देणे,
पूर्णपणे लक्ष्यास साधणे, मग,
येतो क्षण विजयाचा,
खेळभावना पूर्ण ती भिनली,
माझे तुझे ही भावना विरली,
चित्त एक मग प्रगती झाली,
येतो क्षण विजयाचा,
होती काही चुका साऱ्यांच्या,
कधी बाद होतो, जो हो धीराचा,
झेल झेलून कधी, सुटते चिंता,
येतो क्षण विजयाचा,
शेवटी जिंकणे हाच हा ध्यास,
त्यासाठीच सारे प्रयत्न खास,
मोजावे लागती, घाम नी श्वास,
येतो क्षण विजयाचा,
मिळता विजय आनंद दाटतो,
उर अभिमानाने भरून येतो,
सारा देश प्रफुल्लित होतो,
जगतो क्षण विजयाचा…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
