Thursday, November 13, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
वाचक लिहितात… सदरात आपले स्वागत आहे. मागेच स्पष्ट केल्याप्रमाणे  whatsapp च्या बदललेल्या कार्यपद्धतीमुळे आता आपल्याला, व्यक्तिगत whatsapp वर पोर्टल पाठविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे  न्यूज स्टोरी टुडे चे चॅनेल ला जॉईन करणे आवश्यक आहे. ज्यांना अधिक माहिती आवश्यक वाटत असेल, त्यांनी नेहमीच्या 9869484800 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आता पाहू या. गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया..
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ. (संपादक)

“आठवणीतील गंगाराम गव्हाणकर ” या  लेखावर प्राप्त प्रतिक्रिया ….
1
एप्रिल 2025 मध्ये आम्ही सावंतवाडी येथे भरवलेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने *संमेलनाध्यक्ष* म्हणून नाना सावंतवाडीत संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत बराच काळ घालवता आला. त्यांनी आपला संपूर्ण जीवनप्रवास कथन केला. संमेलनाच्या दरम्यान वस्त्रहरण ची लंडनवारी कथन करताना तर हसून हसून पोट दुखले एवढे मिश्किल विनोद त्यांच्या बोलण्यातून येत होते.
नाना तसे माझे नातेवाईक.. माझी वहिनी सिद्धी गवाणकर, माडबन गावची आणि नानांची चुलत पुतणी. त्यामुळे माडबन मध्ये नानाची कधीतरी भेट व्हायची. स्मशानभूमीच्या शेजारी राहून आयुष्याची सुरुवात करणारे नाना लंडनवारी करून आले, यशाची शिखरे पाहिली तरी पाय जमिनीवरच ठेवून माणूस म्हणून उत्तम व्यक्तिमत्व होते.
आज पहाटेच नाना गेल्याची बातमी आली आणि धक्काच बसला. नाना कोमात होते, कोमातून बाहेर आले… मग नक्कीच एक आशा होती ते पुन्हा उभे राहतील अशी…
पण, काळापुढे चालले नाही…
नानांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण आदरांजली 🙏.
— दीपक पटेकर. कोकण
2
सन्मा सौ अलका भुजबळ मॅडम
नमस्कार,
आपल्या न्युज स्टोरी टुडेच्या पोर्टलद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेचे प्रचारक श्री रविंद्र गोळे आणि त्यांचे एक संघ प्रचारक यांची सर्वंकष मुलाखत घेतली. ही मुलाखत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने “समिधा” या ग्रंथात १०१ संघ प्रचारकांनी संघासाठी केलेल्या कामाची माहिती समाजाला व्हावी हा उद्देश ठेवून या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे. असे श्री रविंद्र गोळे यांच्या निवेदनातून स्पष्ट होते.

आपण या दोन्ही संघ प्रचारकांना सरळ आणि स्पष्ट, निर्भीड भाषेत “समिधा” ग्रंथाची पार्श्वभूमी, संघ म्हणजे काय ? आणि प्रचारकांनी संघ सांगेल ते आणि संघ सांगेल तिथे जाऊन संघाचा प्रचार करणे, असा खुलासा श्री रविंद्र गोळे यांनी केला. म्हणजे येथे त्या व्यक्तीला संघाने दिलेल्या कामाबद्दल काय वाटते ? याचा विचार केल्या जात नाही. म्हणजे या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य, संघाच्या विचारात दिसून येत नाही. तथापि, संघ सांगेल ते काम प्रचारकाने निमुटपणे ऐकत सांगेल त्या ठिकाणी जायचे असा विचार दिसून येतो.

आपण या मुलाखती दरम्यान विचारलेले योग्य प्रश्न व त्यासंदर्भात घेतलेला खुलासा खूप छान वाटला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन !!

एक गोष्ट विनम्रपणे सांगु इच्छितो की, संघाचे कार्य हे त्यांच्या विचारसरणीतून‌ राष्ट्र उभारणीसाठी सुमारे शंभर वर्षे सातत्याने करत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन !!

मात्र, केवळ आसाम, त्रिपुरात व देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन संघाचा प्रसार आणि प्रचार या पलिकडे जाऊन कोणते भरीव कार्य केले याबद्दल या दोन्ही प्रचालकांनी स्पष्ट केले नाही. संघाचे  प्रचारक व “समिधा” ग्रंथाचे लेखक – प्रकाशक श्री रविंद्र गोळे यांनी स्वामी विवेकानंदांचे कन्याकुमारी येथील स्मारक समाजाकडून एक एक रूपयाची वर्गणी घेऊन मोठे योगदान दिले. दुसरे म्हणजे श्री दत्तोपंत ठेंगडी या कामगार क्षेत्रातील “भारतीय कामगार संघटना उभी केली. त्याशिवाय अटल बिहारी वाजपेयी आणि काही साहित्यिकांनी समाजाला प्रेरणादायी साहित्यीक लिखाण केले. ही संघाची भूमिका योग्य वाटते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत वा लढ्यात सामील होऊन किती व कोणत्या प्रकारचे योगदान त्यांच्या प्रचारकांनी दिले त्याबद्दल श्री रविंद्र गोळे यांनी कोणतीही माहिती दिली नाही, असे त्यांच्या संभाषणातून दिसून आले नाही. एकुणच काय तर संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या Unsung Heroes प्रचारक यांच्या जीवनावर आधारित “समिधा” ग्रंथाच्या लिखाणाचा मुख्य उद्देश दिसून येतो.

आपण या दोन्ही संघ प्रचारकांच्या घेतलेल्या मुलाखतीतून मला जे कळले तेच मी लिहीले आहे. त्याद्वारे मला कोणाही व्यक्तीच्या भावना दुखविण्याचा किंवा डिवचण्याचा उद्देश नाही. जर कोणाला तसे वाटत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
आपला स्नेहांकित,
राजाराम जाधव. नवी मुंबई.

माध्यमभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यावर, प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…

1
आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ यांना श्री रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते माध्यमभूषण हा पुरस्कार मिळाल्याची आनंद वार्ता कानावर पडली नि मन प्रसन्न झाले. अत्यंत मनापासून सतत कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार मिळणे हा दैवयोगच ! सरांनी अतिशय उत्कृष्ट पारख केली. याचा अर्थ त्यांची दूरदृष्टी अतिशय कौतुकास्पद आहे .समाजाला उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेणाऱ्या या व्यक्तिमत्त्वास अत्यंत मनापासून खूप खूप शुभेच्छा…. आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती हो या अंतकरणापासून शुभेच्छा.. आपलाच
किशोर विभुते आणि सौ संगीता विभूते आणि अकोल्यातील सर्व मित्र परिवार सदैव आपल्या सोबत आहे.
2
नमस्कार सर.
माध्यम भूषण पुरस्काराने आपण सन्मानित झालात त्याबद्दल प्रथम आपले हार्दिक अभिनंदन.
— उद्धव भयावळ. छत्रपती संभाजीनगर.
3
खूप खूप अभिनंदन
गौरव महाराष्ट्राचा या राज्यस्तरीय माध्यम भूषण पुरस्काराने आपणास गौरविण्यात आलेले आहे.
फारच छान.
आपल्या हातून छान छान उपक्रम घडत आहेत ,असेच उपक्रम घडत राहोत या आमच्या थोरवे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा💐💐💐
— सुधीर थोरवे. नवी मुंबई
4
देवेंद्रजी, आपले मनापासून अभिनंदन ! असेच पुरस्कार मिळत राहोत ही शुभेच्छा.
— स्वाती दामले. बदलापूर
5
आदरणीय संपादक साहेब आपणास पनवेल येथे माध्यम भूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…
💐👏💐🤝💐👌💐🕺💐
— गोविंद पाटील. जळगाव
6
कौतुकास्पद आणि प्रेरणादायी.
वाचन संस्कृती वाढिस लावण्यासाठी मोलाचं काम.
— राजेंद्र लेंबे. मुंबई
7
आदरणीय सरजी नमस्कार 🙏
आपणास रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मिळालेल्या “माध्यमभूषण” पुरस्कार गौरवण्यात आला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
आपण केलेल्या कार्याची दखल निश्चितच उल्लेखनीय आहे. सामाजिकदृष्ट्या आपण केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्याचा गौरव पुरस्कार रूपात मिळणे म्हणजे केलेल्या कामाची पावती आहे. सरांनी सांगितल्या प्रमाणे १९९८ पासून आपले कार्य पाहत आले आहेत. यापेक्षा जास्त काय बोलणार.
आपण असेच समाजातील माणसाला नेहमी मदत करतच राहाल. हीच सोमेश्वर चरणी प्रार्थना. असेच यश मिळत राहो. 🙏🌹
आपली विश्वासू
— सौ सीता विशाल राजपूत. बीड.

राधिका भांडारकर लिखित माझी जडणघडण भाग ७० वर प्राप्त  झालेले अभिप्राय…

खूपच  छान.
आज प्रथमच तुझ्या मुलींविषयी एवढी माहिती  मिळाली. शालीला  पक्की पकडून  बसणारी तुझी एक मुलगी तेवढी तिच्या लहानपणी आमच्या चरईतल्या घरी तुम्ही आला होतात तेंव्हा पाहिली होती.
मुलींच्या कर्तृत्वा बद्दल जाणून घेताना खूपच आनंद व कौतुक वाटत वाटले. मुलींना इतके उत्तमरित्या सक्षम बनविण्यात तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचे त्यांनी चीज केले ही खूपच अभिमानास्पद  गोष्ट  आहे. तुम्हा सर्व  कुटुंबाचे खूप खूप  अभिनंदन.
— मृणाल बापट. ठाणे

काय सुंदर लिहिले आहेस !
— आरती नचनानी. ठाणे

खूप छान,
Our children is our real asset.
— अंजोर चाफेकर. मुंबई

राधिका ताई,
माझी कन्यारत्न छान लिहिले आहे. पण अजून थोडे सविस्तर होऊ शकले असते. चार लोकं नेहमीच बोलतात पण तुम्ही गुणगुणले ते गाणे आवडले.
घरात असता हसरे तारे मी पाहू कशाला नभाकडे अगदी खरं आहे. आपली मुलं हे आपण रुजलेल्या संस्काराचा आरसा असतात.
अजून एखादा भाग त्यांच्या वरच लिहावा असे वाटते.
— मानसी म्हसकर. वडोदरा.

भाग्यवान आहात राधिकाताई.
सोन्यासारख्या संततीची छान ओळख करुन दिल्याबद्दल आभार. 👏👌
— छायाताई मठकर पुणे.

Didi used to praise your daughters a lot.
I liked the way u appreciate them.
— Sandhy jangle. Mumbai.

सुंदर !
— अस्मिता पंडीत. पालघर

उत्तम लेखनाला प्रतिक्रियाही उत्तमच मिळणार यात काय शंका आहे ?
खूप छान ताई, तुमचे सर्वच लेखन आवडते.
— सुमती पवार. नाशिक

मुलींच्या जडण घडणीत पालकांचा कसा हातभार असतो अनेक घटनाद्वारे सुरेख मांडले आहे. अनेक पालकानी त्यातून बोध घ्यावा .
— रेखा राव. विलेपार्ले
१०
अतिशय सुंदर लिहिले आहे. वाक्यं वाक्यं वाचताना मुली डोळ्यासमोर  आल्या. 🙏👌✨🧿
— मनीषा भांडारकर. अमळनेर
११
गणेश प्रार्थना खूपच छान !
🙏🌹🙏🌹🙏
— अरुण पुराणिक. पुणे
१२
मुलींना चांगले शिक्षण देऊन  त्यांना घडवणे हे खूप महत्त्वाचे काम आहे..
छान वाटले वाचताना!
आपल्या त्या काळात मुलांना शिक्षण देऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाणे हे खूप विशेष होते..
मुलींनी तुम्ही दिलेल्या चांगल्या संस्कार आणि संधीचे चीज केले हेही खूप मोठे आहे!
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे
१३
खरच लहानपणापासुनच ज्योतिका व मयुरा या हुशार होत्या. अर्थात त्या साठी दादा व वहिनीनीं घेतलेले कष्ट, दादाने त्याचा व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करुन घरात व मुलीनाही हवे तेव्हा सर्व उपलब्ध करून दिले, तसेच वहिनींनी पण नोकरी सांभाळून मुलीचा अभ्यास व सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष दिले. दोघींनीही उच्च शिक्षण घेऊन परदेशात उच्चपदस्थ नौकरी सांभाळुन संसार पण उत्तम प्रकारे करत आहेत. आम्हाला खरच दोघींचा ही खुप अभिमान आहे. अर्थात वहिनींनी नेहमी प्रमाणे सुंदर शब्दांत “माझी कन्यारत्नं” वर्णीले आहेत.
— श्रीकृष्ण भांडारकर अमळनेर

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !