ऋतूमान संपलेले
परतून जा पावसा
अचानक येतो का रे !
ठेवू कसा भरवसा
मुखी घास आला बा रे !
हिरावुन मिळे काय
कृषकाच्या विणा जीणे
धाय मोकलते माय
वर्षभर पोटासाठी
धान्य मोत्याच्या समान
जिव्हाळ्याचे नाते सरे
परतून जा गुमान
लेकी आल्या माहेराला
साडी चोळी कशी घेऊ
हाती न उरला पैका
हाती त्यांच्या काय देऊ
सण वर्षाचा येईल
घर माझे रिते व्हावे
धान्य पूजनाच्या राशी
कोठारात न पहावे

— रचना : शोभा प्रकाश कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
