महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत प्रशासकीय, कायदेविषयक, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयांवरील अभिलेख व कागदपत्रातील मजकूर अनुवाद करण्यासाठी खासगी नामावली तयार करण्यात येत आहे. यासाठी तज्ज्ञ अनुवादकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभिलेख व कागदपत्रांच्या फारसी व उर्दू मजकुरांचे इंग्रजी व मराठी भाषेत अनुवाद करणे तसेच मराठी व इंग्रजी भाषेतील मजकुराचे फारसी व उर्दू भाषेत अनुवाद करणे, तसेच मोडी मजकुराचे मराठीमध्ये लिप्यंतर व इंग्रजीमध्ये अनुवाद करणे, त्याचप्रमाणे इंग्रजी मजकुराचा मराठीत व मराठी मजकुराचा इंग्रजी अनुवाद करण्यासाठी अनुवादकांची खासगी यादी तयार करण्यात येत आहे. यासाठी तज्ज्ञ अनुवादकांनी मराठी भाषा विभागाच्या २२ मार्च २०२१ च्या शासन निर्णयान्वये १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करावे.
याबाबतच्या अटी, शर्ती व इतर सविस्तर माहितीसाठी भाषा संचालनालयाच्या directorate.marathi.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन संबंधितांनी आपले मूळ अर्ज प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रतीसह “भाषा संचालनालय, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 या पत्त्यावर पाठवावेत, असे भाषा संचालक अ.वा.गिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
