कधी कधी हवी असते
भळभळलेल्या जखमेवर
एक हळूवाsssर फुंकर ।।
फुंकर हे औषध नसतेच,
पण दिलासा मात्र देते,
क्षणभर शीतलतेचा ।।
शीतलता हवीच असते,
मनाला आणि जखमेलाही,
ठुसठुस संपण्याचा
शक्यतेच्या काळात ।।
ठुस्ठुसणरी वेदना वाढवते
तणाव मनावरचा,
तयार करते प्रश्नांचा गुंता,
विचारांच्या भुंग्याचा डोंगर उभारते ।।
विचारांचा भुंगा अखेर मन कुरतडतो।
वाटते का हे आपण सोसतो
मनाचं असं कुरतडत जाणं ?
कुरतडणार्या मनावरही
हवीय हळूवाsssर फुंकर,
जी औषध नसते,
पण दिलासा नक्की देते ।।
— रचना : शोभा सुभेदार. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
