तुझ्या लडिवाळ स्पर्शाने
मोहरले मातृत्व माझे
तुझ्या जगी या आगमनाने
सफल झाले अस्तित्व माझे
तुझा उबदार स्पर्श प्रेमाचा
आधार माझ्या भावी स्वप्नांचा
हृदयाची स्पंदने गुंफिली
मौनात अर्थ कळला भावनांचा
या निरागस प्रेमापुढे
फिके पडले विश्व हे सारे
तूच माझा श्वास आता
तूच माझा कान्हा रे
देऊनी जन्म या मातेला
मिळाला जणू स्वर्ग मजला
असा हा अनुपम सोहळा
दोन जीवांच्या नात्यातला
— रचना : विनय पारखी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
