नाशिक जिल्ह्यातील साहित्यिकांना पैठण तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज जन्मस्थानी श्रीक्षेत्र आपेगाव येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात नुकतेच ज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.

संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.संजय कावरे, उदघाटक उर्मिला चाकूरकर, अध्यात्मविवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, भानुदास महाराज कोल्हापूरकर, शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर, भजनसम्राट सदानंद मगर, कामगार नेते रवींद्र शिंदे, सागर शिंदे, उद्योगपती प्रकाश चव्हाण, आर्किटेक्ट महेश साळुंके, शिल्पकार स्वाती साळुंके यांच्या हस्ते, नाशिक जिल्ह्यातील साहित्यिक संजय गोराडे, डाॅ.सतीश पाटील, कवयित्री पूजा बागुल, कवी राजेंद्र उगले, विलास पंचभाई, प्रशांत केंदळे, सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर, गीतकार सोमनाथ पगार, कवयित्री प्रतिभा खैरनार, डाॅ.अंजना भंडारी, कवी सागर जाधव- जोपूळकर, विशाल टर्ले, लेखिका, कवयित्री सुजाता येवले, किरण भावसार, अलका अमृतकर यांना ज्ञानरत्न पुरस्कार सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह स्वरूपात प्रदान करण्यात आले.

संमेलनाचे संयोजन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.विजय पोहनेरकर, संदीप राक्षे, चित्रकार अरविंद शेलार, अलका बोर्डे, शांताराम गायकवाड यांनी केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

खूप खूप धन्यवाद न्यूज स्टोरी टुडे ला🙏🙏