Wednesday, November 12, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार  मंडळी.
आपण सर्व  लेखिका, लेखक, कवयित्री  कवी वाचक आणि  हितचिंतक अशा सर्वानी आजवर जी साथ देत दिलीत, त्याचेच फळ म्हणजे, आपल्या पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांना रेडिओ, टेलिव्हिजन आणि समाज माध्यमातील अत्यंत प्रतिष्ठित असा “रापा” पुरस्कार प्राप्त झाला आहे. आपण सर्व या पुरस्काराचे मानकरी आहात. या निमित्ताने आपल्या सर्वांचे मनापासून आभार  आणि अभिनंदन. आपला लोभ असाच कायम असू द्या.  आपल्या कल्पना,सूचना यांचे स्वागत आहे.

आता पाहू या, वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

सौ अलका भुजबळ यांना “रापा” पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…
1
श्रीमती अलका यांचे हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा.
— प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
2
मनापासून अभिनंदन अलकाताई. तुमच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाची पावतीच या मोठ्या सन्मानाच्या पुरस्काराने आपणास मिडाली आहे.
— प्राचार्य सूर्यकांत द वैद्य. पुणे
3
आदरणीय अलकाताई,
आपणास “रापा” पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल आपले खूप खूऽऽऽऽऽऽऽप मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या यशपुरस्कारांची अशीच चढती कमान राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏💐💐
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
4
हार्दिक अभिनंदन अलका भुजबळ मॅडम ! पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपूर
5
सर्वोत्कृष्ट न्यूज पोर्टल पुरस्कार साठी, सौ अलका भुजबळ मॅडम आपणांस न्यूज स्टोरी टुडे करिता मिळाला, त्यासाठी आपले हार्दिक अभिनंदन अन अगणित शुभेच्छा,
तुम्हा उभायताना 👏
असेच यशवृद्धी यापुढे होत राहो हिच मनस्वी सदिच्छा🙏
— सौ मीना घोडविंदे. ठाणे
6
सौ. वहिनीसाहेबांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा… 
तुमच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे तुमच्या सानिध्यात येणार्‍या व असणार्‍या सर्वच घटकांची व व्यक्तींची प्रगती होते.. यामुळेच आपल्यासारख्या प्रतिभावंतांची वाटचाल उत्तुंग शिखरे गाठण्याकडे व रुषितुल्य व्यक्तीमत्वाकडे होते आहे यात तिळमात्र शंका नाही.
आपणां उभयंताचे मनःपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा..
— रवींद्र घोगे व परीवार.. सिन्नर
7
।। श्री स्वामी समर्थ ।।
मा. अलका ताई ….
नमस्कार व आपले अभिनंदन ….
सर्वोत्कृष्ठ न्यूज पोर्टलसाठी आपणास *रापा* पुरस्कार मिळाल्याचे वाचनात आले. पोर्टल द्वारा समाज प्रबोधन व जनजागृती या सारखे सत्कर्म करीत आहात. त्याचे योग्य ते फळ मिळणें हें निश्चितच गौरवास्पद आहे.
आपले कार्य उत्तरोत्तर अधिक चांगले होईल हा विश्वास आहे , आणि तसें ते व्हावें या साठी आपणांस मनःपूर्वक वासंतिक शुभेच्छा.
एक वाचक व आपला पोर्टल चाहता ….
— अरुण पुराणिक. पुणे.
8
Dear Saheb n Vahini hearty congratulations for the appreciation n felicitations received. Its quite befitting n deserving for  talents she has n the efforts taken by her. Also encouraging efforts u are always  taking for each other.
— Ranjitsinh Chandel. Yavatmal.
9
संपादक साहेब व निर्माती ताईंना सारे पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा
— गोविंद पाटील सर. जळगाव
10
‘रापा’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे, ही सौ अलकाताईंच्या कार्य कर्तृत्वाची पावतीच म्हणावी लागेल. अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
— रविकिरण पराडकर.
निवृत्त सहायक पोलीस आयुक्त, मुंबई.
11
अलका तुझे आदर्श उदाहरण जगासमोर श्रेष्ठ ठरते मनातील भय पळवते.
धन्य आहेस 🌹🙏
— शोभा कोठावदे. नवी मुंबई.

वीरमाता अनुराधा गोरे” या प्रेरणादायी जीवन कथेवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…
1
“वीरमाता अनुराधा गोरे”
चित्रा मेहेंदळे यांचा हा लेख, आदरणीय अनुराधाताईंच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा अगदी सखोल परिचय करुन देतो. खूप छान लेख.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
2
वीरमाता अनुराधा गोरे यांच्याबद्दल भरपूर वाचले, ऐकलय तरीही चित्राताईंचा लेख वाचला. उत्तम लिहिला आहे. अनुराधाताईंची काही पुस्तकं आहेत माझ्याकडे..
हा लेख अग्रेषित करीत आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई

“माध्यमभूषण” पुस्तक: काही प्रतिक्रिया
1
अरेवा ! खूपच छान माध्यमभूषणचा प्रचार आणि प्रसार. मनापासून अभिनंदन! दखलणीय हा शब्द अतिशय आवडला.
“जगातील सर्व भारतीयांनी वंदेमातरम् गीत उत्सव साजरा करायला हवा.” हे अगदी बरोबर.
— राधिका भांडारकर. पुण
2
सर, आपण माध्यमभूषण पुस्तकाच्या संकल्पनेतून विविध माध्यमातील धुरीण, मेहनतीने, स्वकष्टाने परिस्थितीला सामोरे जावून  जीवनात यशस्वी झालेल्या, सर्वच कष्टाळू अन्, होतकरू यांचा, त्यांच्या कार्याचा गौरव केल्याने, उचित सन्मान लाभला आहे. आपण केलेल्या या संकलित लेख पुस्तकामूळे समाजात तुमच्यासह तुमचे न्यूज स्टोरी टुडे याचेही संस्मरणीय, उल्लेखनीय, उज्ज्वल असे नामांकित वैशिष्ठ्य पूर्ण नांव झाले आहे. याचा मला कौतुकासह आनंद लाभला आहे.
      सर, असेच, सामाजिक, विधायक कार्य आपल्याकडून यापुढे ही व्हावे ही मनीची ईच्छा. अन् ईश्वर त्यासाठी आपणांस निरोगी आरोग्य या जेष्ठत्वी वयात प्रदान करो ही प्रार्थना 👏 सौ अलका मॅडम यांची पूर्ण साथ मिळत असल्याने त्यांचेही अन् सर तुमचे ही धन्यवाद मानते 🙏
— सौ.मीना घोडविंदे. ठाणे
लेखिका, कवयित्री, समुपदेशक, समाजसेविका, ठाणे.

राधिका भांडारकर लिखित “माझी जडणघडण” भाग ७१ वर प्राप्त झालेले अभिप्राय
1
खूप सुंदर सत्यकथन !
आजच्या पिढीतील मुलामुलींची लग्न आईवडिलांनी जमविणे हे आता जवळजवळ बादच झाले आहे. कारण एकतर त्यांची वयं मोठी असतात आणि त्यांची विचारक्षमता फार प्रगल्भ असते.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
2
“अनोखा टाका” अगदी बरोब्बर आहे.
आता लग्न कसे ठरले, होकार कसा मिळाला व प्रत्यक्ष लग्न ? सर्व जाणण्याची आता उत्सुकता आहे.
— छाया मठकर. पुणे
3
😊 खरच, मुलगी हा वडिलांचा हळवा कोपरा असतो 😊👍🙏
— अस्मिता पंडीत. पालघर.
4
मस्तच. अगदी वास्तवाला हात लावणारी आणि विनोदी सुद्धा
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
5
मुलींचं लग्नाचं वय झालं की त्या सुशिक्षित, कमावत्या असल्या तरी तोलामोलाचा मुलगा मिळणं अवघड आणि नसल्या तर मुलांच्या अपेक्षांना पु-या न  पडल्यामुळे परिस्थिती अवघड. एकंदरीत लाडाकोडात वाढवलेल्या मुलींसाठी ‘वरसंशोधन’ हा घराघरात चिंंतेेचा आणि मतभेदाचाच विषय असतो हे राधिकाताईंनी आपल्या प्रभावी आणि सहज शैलीत, प्रामाणिक अनुभवातून कथन केले आहे. आपली बाजू आपल्याला भक्कम वाटत असली तरी तडजोडीची तयारी ठेवावीच लागते हे कटुसत्य त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलंय. म्हणूनच त्यांच्या लिखाणात बेगडीपणा कधीच जाणवत नाही.
— साधना नाचणे. ठाणे
6
‘अनोखा टाका’ मस्त झालं आहे.
हे सगळे अनुभव येतातच. आता त्या आठवणी म्हणजे  😊 अशीच सगळ्या स्मृती जपून ठेव.
— अनुपमा. मुंबई

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खरोखरच अशीच अवस्था मुलींचे लग्न जमवताना असते आणि ते शब्दांकित बरोबर केलेले आहे. वाटणारी काळजी ,हुरहुर नंतर काही प्रॉब्लेम व्हायला नको ही वाटणारी भविष्याची चिंता कारण मुलगी म्हणजे हळवा कोपरा विशेषतः वडलांचा त्यामुळे तिला काही आयुष्यात कष्ट नकोत सर्व व्यवस्थित व्हावे हीच इच्छा असते .पण त्यात येणाऱ्या अडचणी प्रत्यक्षपणे आहे तशा मांडण हे खूप मनमोकळेपणाचे लक्षण आहे कुठलीही लपवाछपवी मोठेपणाचा आव त्याच्यात नाही त्यामुळे नकळत आपलीच ही घडलेली अनुभवलेली गोष्ट जाणू लागते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !